- अजय पाटीलजळगाव - आगामी काळात महापालिकेच्या निवडणुकांना आपल्याला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे आपसातील गट-तटाचे राजकारण करु नका, ते कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही. अन्यथा तिकीट देणे व किंवा थांबविणे हे आमच्याच हातात असल्याचे सांगत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपच्या नगरसेवकांना चांगल्या शब्दात खडसावले आहे.
मंगळवारी रात्री बावनकुळे यांच्या उपस्थितीत शहरातील बालाणी लॉन येथे भाजप नगरसेवकांची बैठक झाली. या बैठकीत जिल्हाध्यक्ष सुरेश भोळे, महानगराध्यक्ष दीपक सुर्यवंशी यांच्यासह भाजपचे इतर पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते. आगामी काळात महाविकास आघाडीसोबत लढताना तीन पक्षांचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे पक्षातील मतभेद बाजुला करून पक्षाचे काम करण्याची गरज असल्याचे बानवकुळे यांनी सांगितले. तसेच केंद्र व राज्य शासनाच्या ज्या योजना आहेत. त्या योजना नागरिकांपर्यंत पोहचवण्याच्या सूचना देखील बावनकुळे यांनी दिल्या. आगामी काळातील निवडणुका पाहता, प्रत्येक नगरसेवकाने मतदारांसोबत संपर्क वाढविण्याच्याही सूचना बावनकुळे यांनी दिल्या. पक्षाकडून, नगरसेवकांकडून जी बॅनरबाजी केली जाते. त्या बॅनरबाजीमध्ये नेत्यांच्या फोटोंचा प्रोटोकॉल चुकणार नाही याची काळची घेण्याचा सूचना त्यांनी दिल्या.
कोअर कमिटीच्या बैठकीत नेत्यांना धरले धारेवरचंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपच्या कोअर कमिटीची बैठक देखील पार पडली. या बैठकीत खासदार उन्मेष पाटील, रक्षा खडसे, आमदार सुरेश भोळे, संजय सावकारे, मंगेश चव्हाण यांच्यासह संघटनेतील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत बावनकुळे यांनी सर्वच प्रमुख नेत्यांसह पदाधिकाऱ्यांना धारेवर धरल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. बावनकुळे यांनी काही रिपोट्स पदाधिकाऱ्यांसमोर मांडले. तसेच आगामी काळात मुंबईचे व इतर दौरे कमी करून, पक्षाच्या कामांकडे लक्ष देण्याच्या सुचना बावनकुळे यांनी दिल्या.