जळगाव : महापालिका निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी तसेच उमेवारांनीही प्रचाराला वेग दिला आहे. मतदारांना आपलेसे करण्यासाठी शिवसेना व काँग्रेसने हायटेक प्रचार तंत्र वापरुन हृदयस्पर्शी आवाहन करण्यासाठी ‘आपला माणूस’ या संकल्पनेवर भर दिला आहे. दुसरीकडे भाजपाच्या प्रचाराचे मुद्दे काय राहणार याबाबत उत्सुकता आहे.जळगाव महानगरपालिकेसाठी सत्ताधाऱ्यांकडून रोज एक व्हीडिओ व्हायरल केला जात आहे. त्यात माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्यावरील जळगाकरांचा विश्वास, त्यांचे विविध जाती व धर्माच्या लोकांशी असलेले ऋणानुबंध हे दाखवित ‘आपला माणूस’ या संकल्पनेवर भर दिला आहे.पहिल्या व्हीडिओमध्ये माजी मंत्री सुरेशदादा जैन यांची एकूण ४० वर्षांची कारकिर्द दाखविण्यात आली आहे.नवीन रचनेनुसार प्रभाग मोठे झाले आहेत. प्रत्येक मतदारापर्यंत पोहचणे उमेदवारांना अवघड झाले आहे. त्यामुळे मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी बल्क एसएमएस, व्हाईस कॉलिंग, डॉक्युमेंटरी फिल्म, एलईडी वॉल, व्हॉटस् अप मॅसेज, व्हिडीओ, आॅडिओ सीडी तयार करण्यात येत आहे.एकाच वेळी हजारो मतदारांपर्यंत एका क्लिकवर तंत्रज्ञानाच्या साहाय्याने उमेदवारांना पोहचता येत आहे. त्यासाठी ही सेवा पुरविणाºया कंपन्यांकडून उमेदवारांना पॅकेज देण्यात येत आहे. विविध क्लीप्स व आॅडीओ क्लिप बनविण्याचे कामही यामुळे जोरात सुरु आहे.
जळगावात शिवसेना व काँग्रेसचा ‘आपला माणूस’वर भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 3:31 PM
जळगाव : महापालिका निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी तसेच उमेवारांनीही प्रचाराला वेग दिला आहे. मतदारांना आपलेसे करण्यासाठी शिवसेना व काँग्रेसने हायटेक प्रचार तंत्र वापरुन हृदयस्पर्शी आवाहन करण्यासाठी ‘आपला माणूस’ या संकल्पनेवर भर दिला आहे. दुसरीकडे भाजपाच्या प्रचाराचे मुद्दे काय राहणार याबाबत उत्सुकता आहे.जळगाव महानगरपालिकेसाठी सत्ताधाऱ्यांकडून रोज एक व्हीडिओ व्हायरल केला जात आहे. ...
ठळक मुद्देशिवसेना व काँग्रेसकडून सुरु आहे हायटेक प्रचारमतदार व विविध समाजाप्रती असलेल्या आस्थेचे दाखविले जातेय चित्रीकरणमहापालिका निवडणुकीसाठी रोज एक व्हीडिओ व्हायरल