विजयकुमार सैतवाल -
जळगाव : दोन दिवसांपूर्वी ९० हजार रुपयांच्या आत आलेल्या चांदीच्या भावात पुन्हा वाढ होऊन या दोन दिवसात ती ३ हजार ६०० रुपयांनी वधारली आहे. त्यामुळे शुक्रवार, ७ जून रोजी चांदी ९२ हजार ८०० रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. दुसरीकडे मात्र गुरुवार, ६ जून रोजी ७०० रुपयांची वाढ झालेल्या सोन्याच्या भावात शुक्रवार, ७ जून रोजी २०० रुपयांची घसरण होऊन ते ७२ हजार ९०० रुपये प्रति तोळ्यावर आले आहे.
गेल्या महिन्यात मोठी भाववाढ झालेल्या चांदीच्या भावात मे महिन्याच्या अखेरपासून घसरण होऊन ती ५ जून रोजी ८९ हजार २०० रुपये प्रति किलोवर आली होती. त्यानंतर ६ जून रोजी १ हजार ८०० रुपयांची वाढ होऊन ती ९१ हजार रुपये प्रति किलोवर पोहोचली. शुक्रवार, ७ जून रोजी त्यात पुन्हा १ हजार ८०० रुपयांची वाढ होऊन ती ९२ हजार ८०० रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर चांदीला मागणी वाढल्याने हे भाव वाढल्याचे सुवर्ण व्यावसायिकांचे म्हणणे आहे.