जळगाव : मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसह काकासाहेब शिंदे यांच्या मृत्यूच्यानिषेधार्थ पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला मंगळवारी जळगावात प्रतिसाद मिळाला. शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या फुले मार्केट, गोलाणी मार्केट, दाणाबाजार, सराफ बाजार येथे बंद पाळण्यात आला. शाळा व महाविद्यालये सुरळीत सुरू होती.आपल्या मागण्यांसाठी मराठा समाजाच्यावतीने शांततेच्या मार्गाने ५८ मोर्चे काढण्यात आले, मात्र सरकारने हा विषय गांभीर्याने घेतला नाही, असा आरोप मराठा क्रांती मार्चाच्यावतीने करण्यात आला. त्यानंतर सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी बाजारपेठेत जाऊन बंदचे आवाहन केले. त्यानुसार दुपारी पावणे दोन वाजेपासून शहरातील महात्मा फुले मार्केट, गोलाणी मार्केट, दाणाबाजार, सराफ बाजार, नवीपेठ या भागात सर्व पदाधिकाऱ्यांनी फिरुन व्यापाºयांना दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. त्यानुसार व्यापाºयांनीही प्रतिसाद देत दुकाने बंद केली. हळूहळू सव्वा तीन वाजेपर्यंत या सर्व परिसरातील दुकाने बंद झाली. कोठेही वादविवाद न होता सर्वत्र शांततेत दुकाने बंद करण्यात आली.
जळगावात कडकडीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 9:06 PM
मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसह काकासाहेब शिंदे यांच्या मृत्यूच्यानिषेधार्थ पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला मंगळवारी जळगावात प्रतिसाद मिळाला.
ठळक मुद्देजळगावात महाराष्ट् बंदला प्रतिसादमराठा क्रांती मोर्चातर्फे शांततेत आंदोलनदुकाने बंद करण्याचे शांततेत आवाहन