- कुंदन पाटीलजळग़ाव - फेब्रुवारी २०२३ मध्ये कांद्याच्या दरात प्रचंड घसरण झाली. त्यामुळे उत्पादकांची प्रचंड आर्थिक कोंडी झाली. त्यामुळे राज्य शासनाने दि.१ फेब्रुवारी ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत लाल कांद्याची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल ३५० रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ६३९८ शेतकऱ्यांसाठी १२ कोटी ४९ लाख ३८ हजार ५५३ रुपयांचे अनुदान उपलब्ध झाले असून लवकरच ती रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा होणार आहे.
राज्यात विविध बाजारपेठांमध्ये कांद्याचे भाव पडल्याने नुकसान झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना राज्य शासन विशेष अनुदान देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील बाजार समितीत कांदा विकलेल्या ६ लाख ६१ हजार ४११ क्विंटल कांद्याची आवक संबंधित कालावधीत झाली होती.त्यानुसार शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल ३५० रुपये अनुदान मिळणार आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने २३ कोटी १६ लाख १ हजार ७७५ १२ कोटी ३५ लाख ५९ हजारांचे इतक्या अनुदानाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला होता. त्यानुसार ५३.९४ टक्के अनुदान राज्य शासनाने वितरीत केले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील उत्पादकांसाठी १२ कोटींवर अनुदान उपलब्ध झाले आहे.उर्वरीत १० कोटी ६६ लाख ७९ हजार २०० रुपयांचे अनुदानही लवकरच उपलब्ध होईल, अशी माहिती सुत्रांनी दिली.
बाजार समितीनिहाय अनुदानासाठी प्राप्त लाभार्थीबाजार समिती लाभार्थी आवक (क्विंटल) आवश्यक अनुदानचाळीसगाव २,९२७ २,००,०६९ ७,००,२४,९९८अमळनेर २ १४४ ५०,६१०बोदवड ३३३ ६०,४९१ २,११,७१,९६९भुसावळ ३१ ५,२७८ १८,०५, ७२०जळगाव १३३३ ११, ००६४ ३,८५,२२,४६०चोपडा ९११ १, ४७,७४१ ५,१८, ७५,१३१यावल ८६० १,३७, ५३० ४, ८१, ३५, ६५५पाचोरा १ ९१ ३१, ९०९