- अमित महाबळजळगाव - दिवाळी नसली, तरी दिवाळीचा उत्साह आहे. एक हजारपेक्षा अधिक घरांमध्ये गोडधोडाचे जेवण बनणार आहे. कारण, गेली अनेक वर्षे ते ज्याची वाट पाहत होते, ते प्रत्यक्षात समोर आले आहे. जिल्ह्यात १३१ शाळांमधील एक हजारपेक्षा अधिक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना वेतन अनुदान लागू झाले आहे. याचा लाभ त्यांना ३१ मार्चपूर्वी मिळेल. मंगळवारी, या आदेशाचे वाटप शाळांना करण्यात आले.
गेली अनेक वर्षे शाळांच्या अनुदानाचा विषय प्रलंबित होता. गेली १७ वर्षे राज्यातील अनेक शिक्षक अनुदान नसलेल्या शाळांमधून तुटपुंज्या पगारावर काम करत होते. त्यांना अनुदान देण्याचा धोरणात्मक निर्णय गेल्या वर्षी सरकारने घेतला आणि फेब्रुवारी महिन्यात आदेश काढला. ११०० कोटी रुपयांची तरतूद केली. त्यासाठी शाळांकडून संचमान्यता मागविण्यात आली होती. त्यांच्या पडताळणीचे काम शिक्षण विभागाने पूर्ण केले आहे. जि.प. माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांच्या हस्ते प्रस्ताव परिपूर्ण असलेल्या शाळांच्या मुख्याध्यापकांना अनुदान मान्यतेचे आदेश वितरित करण्यात आले. यावेळी वेतन पथक अधीक्षक शर्मा, मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष जे. के. पाटील, उपशिक्षणाधिकारी एजाज शेख, अधीक्षक किशोर वानखेडे, साधना लोखंडे, पुष्पा पाटील, जी. एन. पाटील आदी उपस्थित होते.
छाननीचे काम अजूनही सुरूअद्यापही काही शाळांच्या प्रस्तावातील त्रुटी पूर्ततेचे काम सुरू आहे. ते ३१ मार्च अखेर पूर्ण केले जाईल. अनुदान वित्तीय वर्ष संपण्यापूर्वी खर्ची घालायचे आहे. बुधवारी, शालार्थ आयडीचे शिबिर मू. जे. महाविद्यालयात आयोजित करण्यात आले आहे. शालार्थ आयडी मिळालेल्या शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ३१ मार्चपूर्वी पगार मिळेल. अनुदान पात्र शाळाअनुदान - शाळा - शिक्षक२० टक्के - ६८ - ३८८४० टक्के - १७ - ९८६० टक्के - ४८ - ५४५