जळगाव : पावसाळा संपला तरी डेंग्यूची दहशत शहरात कायम असून अनेक भागात डेंग्यू सदृष्य आजाराचे रुग्ण आढळत आहे. त्यामुळे शहरवासीय भयभीत झाले असताना मनपा व ग्रामपंचायच्या हद्दीच्या वादात शहरातील वाघनगरवासीयांचा जीव धोक्यात असल्याच्या प्रतिक्रिया या भागातील रहिवाशांनी व्यक्त केल्या.पावसाळ््यामध्ये शहरात डेंग्यूच्या साथीने हातपाय पसरविल्यानंतर यंदाही डेंग्यूने शहरात कहर केला होता. त्यात शिवाजीनगरातील एका मुलीचा मृत्यू झाला. तसेच गेल्या महिन्यात जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनाही डेंग्यूची लागण झाली होती. तसे पाहता पावसाळा संपल्याने डेंग्यूही नियंत्रणात येणार असे वाटत असताना अद्यापही वाघनगर, सुप्रीम कॉलनी, रामेश्वर कॉलनी, गायत्री नगर, महाबळ परिसर या भागातही डेंग्यू सदृष्य आजाराचे रुग्ण असल्याच्या तक्रारी आहेत.युवकाचा मृत्यूवाघनगरातील उल्हास किरण वासेपाय (१६) या युवकाचा डेंग्यूने मृत्यू झाल्याने परिसरात घबराट पसरली आहे.एकमेकांकडे बोटवाघनगर परिसर सावखेडा ग्रामपंचायत हद्दीत येत असल्याने मनपाकडून तेथे उपाययोजना केल्या जात नाही व जि.प.कडे तक्रार करूनही त्याची दखल घेतली जात नाही, असे रहिवाशांचे म्हणणे आहे. त्यामुळे हद्दीच्या वादात रहिवाशांचा जीव धोक्यात असल्याचे या परिसरातील रहिवाशांचे म्हणणे आहे.या संदर्भात मनपा आरोग्य विभागाचे एस.व्ही. पांडे यांनी सांगितले की, वाघनगर परिसर ग्रामपंचायत हद्दीत येतो. या संदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर तसेच जिल्हा हिवताप अधिकारी सविता पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
जळगावात हद्दीच्या वादात रहिवाशांचा जीव धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2018 11:59 AM
डेंग्यूच्या भीतीने शहरवासीय धास्तावलेलेच
ठळक मुद्देवाघनगरवासीयांची व्यथा युवकाचा मृत्यू