जळगाव : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे शुक्रवार ८ जून रोजी दहावीचा निकाल घोषित करण्यात आला. यात नाशिक विभागाचा ८७.४२ टक्के निकाल लागला. खान्देशात ८८.०८ टक्क्यांसह जळगाव अव्वल राहिले. त्यापाठोपाठ धुळे ८७.५१ तर नंदुरबारचा ८०.७४ टक्के निकाल लागला. बारावीच्या निकालाप्रमाणे दहावीच्या निकालात देखील मुलीच सरस राहिल्या.नाशिक विभागातून दोन लाख ५४ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली. त्यात एक लाख ११ हजार ६५५ विद्यार्थी तर ८८ हजार ३९९ मुलींचा समावेश होता. त्यातील ९५ हजार ८१ मुले तर ७९ हजार ८११ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. जळगाव जिल्ह्यातील १३१ परीक्षा केंद्रावर ही परीक्षा झाली. त्यात ३५ हजार १०५ मुलांनी तर २५ हजार १३७ मुलींनी दहावी परीक्षा दिली. एकुण ६० हजार २४२ विद्यार्थ्यांपैकी ५३ हजार ६० विद्यार्थी उत्तीर्ण झाले.धुळे जिल्ह्यातील २९ हजार ९८ विद्यार्थ्यांपैकी २५ हजार ४६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर नंदुरबार जिल्ह्यातील २० हजार ४३१ विद्यार्थ्यांपैकी १६ हजार ४९७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. नाशिक जिल्ह्यातील ९० हजार २८३ विद्यार्थ्यांपैकी ७९८७२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. नाशिक विभागाचा निकाल ८७.४२ टक्के राहिला.नाशिक विभागातून ४९ हजार ७४१ विद्यार्थी विशेष प्राविण्यसह, ७५ हजार २२९ प्रथम श्रेणीसह ४४ हजार २४५ द्वितीय श्रेणी, ५६७७ पास श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
दहावी परीक्षेत ८८.०८ टक्के निकालासह जळगाव खान्देशात अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2018 12:40 PM
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे शुक्रवार ८ जून रोजी दहावीचा निकाल घोषित करण्यात आला. यात नाशिक विभागाचा ८७.४२ टक्के निकाल लागला. खान्देशात ८८.०८ टक्क्यांसह जळगाव अव्वल राहिले.
ठळक मुद्देधुळ्याचा ८७.५१ तर नंदुरबारचा ८०.७४ टक्के निकालनाशिक विभागात दहावी निकालात मुलींची बाजी४९ हजार ७४१ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण