शहरं
Join us  
Trending Stories
1
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
2
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
3
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
4
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
5
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
6
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
7
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
8
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
9
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
10
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योग गुरूंनीच सांगितलं...
11
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
12
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
13
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
14
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
15
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
16
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
17
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
18
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
19
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
20
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा

जळगाव येथे वाहतूक पोलिसांनी आकाशवाणी चौकात कारमध्ये ३० लाखाची रोकड पकडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 10:50 PM

आकाशवाणी चौकात गुरुवारी सायंकाळी पाच वाजता नियमाचे उल्लंघन केलेल्या कारला वाहतूक पोलिसांनी अडविले असता त्या कारमध्ये मागील सीटवर गोण्यांमध्ये ३० लाख रुपयांची रोकड आढळून आली.

ठळक मुद्दे  अमळनेर येथून बोदवड जात होती रक्कम कार, रोकड व तिघांना घेतले ताब्यात चौकशीअंती रोकड निघाली फायनान्स कंपनीची

आॅनलाईन लोकमतजळगाव दि, २२:   आकाशवाणी चौकात गुरुवारी सायंकाळी पाच वाजता नियमाचे उल्लंघन केलेल्या कारला वाहतूक पोलिसांनी अडविले असता त्या कारमध्ये मागील सीटवर गोण्यांमध्ये ३० लाख रुपयांची रोकड आढळून आली. इतक्या मोठ्या प्रमाणात रोख रक्कम व त्याबाबत कोणतेही कागदपत्रे नसल्याने पोलिसांनी कारसह रोकड व त्यातील तिघांना शहर वाहतूक शाखा व तेथून जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला नेण्यात आले. चौकशीअंती ही रक्कम नियमात असल्याचे स्पष्ट झाले.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आकाशवाणी चौकात गुरुवारी शहर वाहतूक शाखेचे पंडित वानखेडे, नितीन ठाकूर व शैलेंद्र बाविस्कर या तिघांची ड्युटी होती. सायंकाळी पाच वाजता पाळधीकडून आलेल्या कारने (क्र.एम.एच.०२ बी.जी.६६७४) सिग्नल नियमाचे उल्लंघन केले. त्यामुळे ड्युटीवरील तिन्ही पोलिसांनी कार थांबवून चालकाकडे वाहन परवान्याची चौकशी केली असता त्याच वेळी मागे एक जण बसलेला होता तर पांढºया गोण्यांमध्ये काही वस्तू भरलेल्या होत्या. पोलिसांनी त्याबाबत चौकशी केली असता त्यात ३० लाख रुपये असल्याचे कारमधील दोघांनी सांगितले. मात्र कोणतेच कागदपत्रे नसल्याने संशयावरुन पोलिसांनी कार शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयात आणली. चौकशीत रक्कम निघाली अधिकृतवाहतूक शाखेच उपनिरीक्षक फडतरे यांनी रकमेबाबत चौकशी केली असता ही रक्कम ग्रामीण कोटा फायनान्स प्रा.लि.बंगळुरु यांच्या मालकीची असल्याचे निष्पन्न झाले. कारमध्ये विभागीय व्यवस्थापक मगबुल पाशा व अमळनेर शाखेचे व्यवस्थापक संतोष पवार होते. अमळनेर येथून बोदवड येथे ही रक्कम नेण्यात येत होती. अमळनेर येथून कागदपत्रे मागविल्यावर रक्कम अधिकृत असल्याचे स्पष्ट झाले. जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला अपर पोलीस अधीक्षक बच्चन सिंह व उपअधीक्षक सचिन सांगळे यांनीही या प्रकरणाची चौकशी केली. स्टेशन डायरीला नोंद घेऊन कार सोडण्यात आली. इतकी मोठी रक्कम नेतांना सुरक्षिततेच्या बाबतील खबरदारी घेतली नसल्याने पोलिसांनी व्यवस्थापकांना खडसावले.

टॅग्स :JalgaonजळगावCrimeगुन्हा