जळगाव : घरी आलेल्या मामासह इतर नातेवाईकांना रेल्वेस्टेशनवर सोडण्याठी जात असलेल्या शुभम विनोद मिस्तरी (वय २४, रा. बांधकाम विभाग निवासस्थान, काव्यरत्नावली चौक) या दुचाकीस्वार तरुणाला मागून आलेल्या आयशरने चिरडल्याची घटना शनिवारी दुपारी ३.४५ वाजता हॉटेल रॉयलसमोर घडली. शुभम याच्या दुचाकीच्या मागील रिक्षात मामा तर पुढे गेलेल्या रिक्षात आई, वडील होते. मामाच्या डोळ्यादेखतच हा अपघात झाला.सार्वजनिक बांधकाम विभागात अकाउंटट म्हणून कार्यरत असलेले विनोद मधुकर मिस्तरी हे पत्नी कविता, मुलगा शुभमसह ते काव्यरत्नावली चौकाजवळील बांधकाम विभागाच्या निवासस्थानात वास्तव्यास आहे. शुभमच्या चुलत बहिणीचे शनिवारी लग्न होते. त्यासाठी मामा गणेश सूर्यवंशी (पुणे) व इतर नातेवाईक लग्नासाठी जळगावात आले होते. शनिवारी हे सर्व नातेवाईक शिरपुर व सुरत येथे जात होते. त्यांच्यासोबत शुभम व त्याचे आई,वडीलही होते. घरुन सर्व जण रिक्षाने तर शुभम हा दुचाकीने निघाला होता.कारचा कट अन् आयशरचे चाक डोक्यावरुन गेलेशुभम दुचाकीने (क्र.एम.एच १९, बीएल ८६८३) जात असताना हॉटेल रॉयलसमोर एका कारचा शुभमच्या दुचाकीला कट लागला व त्यात शुभम दुचाकीवरुन खाली पडला. त्याचवेळी जैन कंपनीतून आलेल्या आयशरच्या (क्र. एम.एच १८ एच १५३६) मागील चाकात शुभम चिरडला गेल्याने जागीच गत प्राण झाला अशी माहिती आयशर चालकानेच पोलिसांना दिली.आरसीपीच्या बंदोबस्तात हलविले आयशर चालकालाअपघातात जागेवरच तरुणाचा मृत्यू झाल्याने नागरिकांनी आयशर चालक रामानंद अनिल साळुंखे (रा.बांभोरी, ता.धरणगाव) याला बेदम मारहाण केली. या चालकाला जिल्हा रुग्णालयात आणल्यावर तेथेही बेदम मारहाण झाली. घटनेचे गांभीर्य व नागरिकांचा संताप पाहता चालकाला आरसीपी प्लाटूनच्या बंदोबस्तात जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला हलविले. शुभमचे मामा गणेश सूर्यवंशी यांच्या फिर्यादीवरुन चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
जळगावात मामाच्या डोळ्यादेखत ट्रकने भाच्याला चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 5:15 PM
घरी आलेल्या मामासह इतर नातेवाईकांना रेल्वेस्टेशनवर सोडण्याठी जात असलेल्या शुभम विनोद मिस्तरी (वय २४, रा. बांधकाम विभाग निवासस्थान, काव्यरत्नावली चौक) या दुचाकीस्वार तरुणाला मागून आलेल्या आयशरने चिरडल्याची घटना शनिवारी दुपारी ३.४५ वाजता हॉटेल रॉयलसमोर घडली.
ठळक मुद्देहॉटेल रॉयल पॅलेसमोर अपघातचालकाला जमावाने झोडपलेनातेवाईकांना स्टेशनवर सोडण्यासाठी जात असताना झाला अपघात