शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
2
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
3
कोण होणार अमेरिकेचा अध्यक्ष ट्रम्प की हॅरिस? 40 वर्षांत ज्यांची भविष्यवाणी कधी खोटी ठरली नाही त्यांनी सांगितलं
4
'स्विंग स्टेट्स' ठरवणार अमेरिकेचा नवा राष्ट्राध्यक्ष! ट्रम्प २० राज्यांत; कमला १० राज्यांत विजयी
5
SSY की SIP…मुलीच्या भविष्यासाठी कुठे गुंतवावा पैसा, कनफ्युज असाल तर समजून कुठे मिळेल जास्त पैसा?
6
इस्रायलचा गाझामध्ये पुन्हा मोठा हल्ला! एअरस्ट्राइकमध्ये महिला-मुलांसह ३० जणांचा मृत्यू
7
१६ दिवसांत ४८ लाख जोड्या अडकणार रेशीमगाठीत, ६ लाख कोटींची उलाढाल?
8
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
10
'कार्तिकी' यात्रेसाठी रेल्वेकडून विशेष गाड्या, भाविकांसाठी मध्य रेल्वेचे नियोजन
11
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
12
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
13
भाजपाच्या विदर्भातील बालेकिल्ल्यातच प्रतिष्ठेची लढत, परिवर्तनाच्या लाटेवर काँग्रेसची भिस्त
14
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
15
'मिरज पॅटर्न' चौथ्यांदा चालेल? भाजपाच्या सुरेश खाडे यांच्यासमोर महाविकास आघाडीचे आव्हान, तानाजी सातपुते यांच्याशी लढत
16
"मविआ म्हणजे विकासाचे मारेकरी", मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात
17
सर्वच खासगी मालमत्ता जप्तीचा सरकारला अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाचा ७:२ बहुमताने निकाल
18
आता पोलिसांसह प्रत्येक सरकारी वाहनाचे चेकिंग, शरद पवारांच्या आरोपाची आयोगाकडून दखल
19
पती-पत्नीला एकमेकांच्या हेरगिरीची परवानगी नाही, मद्रास व हिमाचल हायकोर्टाचे मत
20
'ऑलिम्पिक २०३६'च्या आयोजनास सज्ज, भारताने आयओसीकडे सोपविले आशय पत्र

जळगावात भरधाव ट्रकने मोहाडीच्या महिलेला चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2018 1:20 PM

नातेवाईकांकडे जात असताना राष्ट्रीय महामार्गावर झाला अपघात

ठळक मुद्देअपघातग्रस्त ट्रक व दुचाकी पोलिसांनी घेतली ताब्यातअपघातानंतर पत्नीचा मृतदेह पाहून पती बेशुद्धमिस्तरी काम करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह

आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.५ : अमळनेर तालुक्यातील भरवस येथे नातेवाईकांकडे दुचाकीने जात असलेल्या वसंत पंडीत खैरनार (वय ६०) व त्यांच्या पत्नी मिराबाई खैरनार (वय ५२) रा.मोहाडी, ता.जळगाव या दाम्पत्याला मागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने ट्रकच्या टायरखाली येऊन मिराबाई खैरनार यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात रविवारी सकाळी साडे सात वाजता महामार्गावर बांभोरी येथील जैन इरिगेशन या कंपनीच्या समोर झाला.वसंत खैरनार व त्यांच्या पत्नी मीराबाई भरवस येथे नातेवाईकांकडे जाण्यासाठी दुचाकीने (क्र. एम.एच.१९ ए.जे.४४१७) सकाळी सात वाजता घरातून बाहेर पडले. बांभोरीजवळ जैन इरिगेशन कंपनीजवळ मागून आलेल्या ट्रकने (क्र.डब्यु.बी.२३ ई ९४१५) जोरदार धडक दिली. त्यात वसंत खैरनार हे रस्त्याच्या कडेला फेकले गेले तर त्यांच्या पत्नी रस्त्यावर पडल्याने या ट्रकचे टायर त्यांच्या अंगावरुन गेले. त्यामुळे त्या जागीच गतप्राण झाल्या.मिस्तरी काम करुन कुटुंबाचा उदरनिर्वाहखैरनार यांची परिस्थिती साधारण आहे. त्यांना एक मुलगा व पाच मुली आहे. त्यापैकी तीन मुलींचे लग्न झालेले असून मुलगा हरिलाल व दोन मुली अविवाहित आहेत. मिस्तरी काम करुन ते कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. आई ठार झाल्याने मुलांना मोठा धक्का बसला. जिल्हा रुग्णालयात त्यांनी प्रचंड आक्रोश केला. शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह मोहाडी येथे नेण्यात आला. याप्रकरणी पाळधी पोलिसात नोंद करण्यात आली आहे.पत्नीचा मृतदेह पाहून पती बेशुद्धअंगावरुन ट्रक गेल्याने मिराबाई यांच्या शरीरातील मांस बाहेर आले. ते रस्त्यावर पसरले होते. या अपघातात जखमी झालेल्या वसंत खैरनार हे प्रकार पाहिल्यावर जागेवरच बेशुध्द पडले. दरम्यान, जैन इरिगेशन कंपनीच्या सहकाºयांनी तत्काळ पाळधी पोलिसांना घटनेची माहिती कळवून घटनास्थळ गाठले. सहायक फौजदार रमेश पाटील, किरण धमके व सुमित पाटील यांनी मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला. तर अपघातग्रस्त ट्रक व दुचाकी ताब्यात घेतली. दरम्यान, घटना घडल्यानंतर चालक ट्रक सोडून पळून गेल्याची माहिती पोलिसांनी दिली.

टॅग्स :JalgaonजळगावAccidentअपघात