जळगाव : बिकट अवस्था होऊन वांरवार अपघात होणाऱ्या औरंगाबाद रस्त्याचे मंगळवारी डांबरीकरण करण्यात आले. यात अजिंठा चौफुलीपासून बाजार समितीपर्यंत हे डांबरीकरण करण्यात आले. दरम्यान, ईच्छादेवी ते अजिंठा चौफुली दरम्यानच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे कायम असून त्यामुळे वाहनधारकांचे मोठे हाल होत आहेत.शहरातून जाणाºया औरंगाबाद रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट आहे. त्यामुळे बाहेर गावाहून येणाºया वाहनधारकांसह औद्योगिक वसाहतीमध्ये जाणाºया उद्योजक, अधिकारी, कामगार यांचेही दररोज हाल होतात. विशेष म्हणजे संध्याकाळी तर वाहनांची गर्दी वाढून वेगही कमी होतो. त्यामुळे वाहतुकीची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यामुळे या रस्त्याच्या दुरस्थीची गेल्या अनेक दिवसांपासून मागणी होती. अखेर त्यास मुहूर्त लागून मंगळवारी अजिंठा चौफुलीपासून ते कृषी उत्पन्न बाजार समितीपर्यंत एकेरी मार्गाने डांबरीकरण करण्यात आले. या सोबतच त्यापुढील भागात सोमवारी एका बाजूने डांबरीकरण झाल्यानंतर दुसºया बाजूचेही मंगळवारी डांबरीकरण करण्यात आले.इच्छादेवी चौक ते अजिंठा चौफुली दरम्यान हाल कायमनागपूर-मुंबई या राष्टÑीय महामार्गावरील जळगाव शहरातून जाणाºया रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट आहे. त्यातच ईच्छादेवी ते अजिंठा चौफुली दरम्यानच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे या ठिकाणी सातत्याने अपघात होत आहेत. या विरोधात चार दिवसांपापूर्वी शिवसेनेच्या ग्राहक संरक्षण कक्षातर्फे ‘नही’च्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन दुरूस्तीची मागणी करण्यात आली होती.मात्र या रस्त्याची दुरवस्था कायम आहे. अधिकारी अजून किती अपघातांची प्रतीक्षा करीत आहे, असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
जळगाव - औरंगाबाद मार्गाचे अखेर डांबरीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 12:00 PM