ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 26 - शहरात डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया व इतर वाढत्या रोगराईस आळा बसावा व नागरिकांचे आरोग्य चांगले रहावे यासाठी महाबळ परिसरातील प्रभाग क्रमांक 36 मध्ये नगरसेविका अश्विनी देशमुख यांनी पुढाकार घेऊन सुरू केलेल्या कचराकुंडीमुक्त वार्ड या उपक्रमास जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांनी भेट देऊन त्याची पाहणी केली. तसेच या उपक्रमाचा शुभारंभ त्यांच्याहस्ते करण्यात आला. स्वच्छ महाराष्ट्र अभियानातंर्गत कचरा व कचराकुंडीमुक्त वार्ड अभियानाच्या शुभारंभप्रसंगी जिल्हाधिकारी निंबाळकर यांच्यासह प्रभागाच्या नगरसेविका अश्विनी देशमुख, आरोग्य अधिकारी उदय पाटील, विनोद देशमुख यांच्यासह प्रभागातील नागरिक उपस्थित होते.
नागरीकांचा स्वच्छतेत सहभाग शहरातील नागरीकांचा स्वच्छतेत सहभाग वाढावा, तसेच रोगराईस आळा बसून प्रभागातील नागरीकांचे आरोग्य सुदृढ रहावे, प्रभागात स्वच्छता राहवी, वार्ड कचरा व कचराकुंडी मुक्त रहावा, यासाठी नगरसेविका देशमुख यांनी प्रभागातील सर्व मोकळ्या जागांवर ठेवण्यात आलेल्या कचराकुंडय़ा हटविल्या व कचरा हा फक्त घंटागाडीतच टाकावा, असे ठिकठिकाणी फलक लावून नागरिकांना आवाहन केले आहे. नागरिकांकडूनही या आवाहनास प्रतिसाद मिळत आहे. यासाठी प्रभागातील प्रत्येक गल्लीत दररोज घंटागाडी पाठविण्यात येत आहे. या अभियानाचा शुभारंभ आज जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
अतिक्रमण मोहिम व साफसफाईची पाहणीजिल्हाधिकारी निंबाळकर यांनी शहरातील अतिक्रमण मोहिम तसेच शहरातीलसाफसफाईची पाहणी केली. शनिवारी सकाळी जिल्हाधिका:यांनी जिल्हा रुग्णालय परिसराची तसेच अतिक्रमण काढलेल्या सुभाष चौक परिसर, स्टेशन रोड परिसर, राजश्री शाहू महाराज रुग्णालयाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी शहरात नव्याने बांधण्यात येत असलेल्या नाटय़गृहास भेट देऊन तेथे सुरु असलेल्या कामाची पाहणी केली.