आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. १४ - महाराष्टÑ लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) रविवारी घेण्यात आलेल्या महाराष्टÑ दुय्यम सेवा अराजपत्रीत गट-ब पूर्व परीक्षेचा पेपर संपल्यानंतर उत्तर पत्रिका घरी नेणाऱ्या हर्षा प्रभाकर पाटील (रा.वाघ नगर, जळगाव) या विद्यार्थिनीविरुध्द रामानंद नगर पोलीस स्टेशनला अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, केसीई सोसायटी कॉलेज आॅफ एज्युकेशन अॅँड फिजिकल एज्युकेशन, मू.जे.महाविद्यालय परिसरातील उपकेंद्र क्र.जे.एल.०९ या ठिकाणी रविवारी महाराष्टÑ लोकसेवा आयोगामार्फत महाराष्टÑ दुय्यम सेवा अराजपत्रीत गट-ब पूर्व परीक्षा घेण्यात आली. या केंद्रावर जिल्हा परिषदेच्या अर्थ विभागातील वरिष्ठ सहायक गोपाळ बाबुराव संत यांची समवेक्षक म्हणून नियुक्ती झाली होती. सकाळी ११ ते १२ या वेळेत परीक्षेचा लेखी पेपर होता. दुपारी बारा वाजता पेपर सुटल्यानंतर समवेक्षक संत उत्तर पत्रिका जमा करीत असताना पहिल्या रांगेतील हर्षा पाटील ही विद्यार्थिनी उत्तरपत्रिका (क्र.१३२०३१९) घेऊन दरवाजाच्या बाहेर गेली. आवाज दिला असता हर्षा ही पळून गेली असे संत यांनी तक्रारीत म्हटले आहे.पोलिसांनी संपर्क साधल्यानंतर विद्यार्थिनी हजरया प्रकरणी समवेक्षक संत यांनी रामानंद नगर पोलीस स्टेशनला तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल झाला. हर्षा हिने सादर केलेल्या आधारकार्ड, पॅन कार्ड व इतर कागदपत्राच्या झेरॉक्सवर वरणगाव फॅक्टरीचा पत्ता होता. त्यावर असलेल्या मोबाईल क्रमांकावर पोलिसांनी संपर्क साधला असता हर्षा ही सायंकाळी रामानंद नगर पोलिसात उत्तरपत्रिकेसह हजर झाली. पोलिसांनी ही उत्तरपत्रिका जप्त केली. जामीनपात्र गुन्हा असल्याने तिला अटक झाली नाही.चुकून उत्तरपत्रिका घरी घेवून गेले : विद्यार्थिनीविद्यार्थिनी उत्तरपत्रिका घेऊन गेल्याची माहिती केंद्राच्या बाहेर गेल्यानंतर एकच खळबळ उडाली.स्थानिक पातळीवर प्रशासनातील अधिकारी यांनी ही बाब आयोगाच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर सायंकाळी या प्रकरणी गुन्हा दाखल झाला. दरम्यान, या प्रकरणात उत्तरपत्रिका पॅडला लावलेली राहून गेली, त्यामुळे चुकून ही उत्तरपत्रिका घरी गेल्याचा दावा विद्यार्थिनीने केलेला आहे. या उत्तरपत्रिकेत काही प्रश्नांची उत्तरे लिहिलेली नव्हती, अशीही माहिती सूत्रांनी दिली.११९८ उमेदवारांची दांडीशहरातील २० केंद्रांवर रविवारी ही परीक्षा झाली. एका केंद्रावरील विद्यार्थिनीने उत्तरपत्रिका घरी घेऊन जाण्याच्या प्रकाराव्यतिरिक्त परीक्षा सुरळीत पार पडल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.या परीक्षेसाठी एकूण ६२४८ उमेदवार होते. यापैकी ५०५० उमेदवारांनी परीक्षा दिली तर तब्बल ११९८ उमेदवार गैरहजर होते.परीक्षा केंद्रावरुन घरी घेऊन गेलेल्या विद्यार्थिनीची उत्तरपत्रिका स्वीकारली जाणार नाही.-अभिजित भांडे- पाटील, उपजिल्हाधिकारी.
जळगावात विद्यार्थिनीने ‘एमपीएससी’ची उत्तरपत्रिका नेली घरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 12:48 PM
विद्यार्थिनीविरुध्द गुन्हा
ठळक मुद्देधक्कादायक प्रकार११९८ उमेदवारांची दांडी