जळगाव : जळगावातील तालुका पोलीस स्टेशनजवळ असलेल्या ६० फूट खोल खदानीत जयश्री रवींद्र पाटील (४५, रा. सुदत्त कॉलनी, आव्हाणे रोड, जळगाव) या महिलेने शनिवारी सकाळी उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली. याप्रकरणी तालुका पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे.
जळगावातील जयश्री रवींद्र पाटील या शनिवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास घरातून बाहेर पडल्या. त्यानंतर सकाळी ७.३० वाजता पाटील यांनी तालुका पोलीस स्टेशनजवळील ६० फूट खोल खदानीत उडी घेतली. सुदैवाने खदानीत पाणी साचलेले असून त्यावर पानथळ उगवलेली आहेत. त्या काठाजवळीत पाणथळीवर पडल्याने थोडक्यात बचावल्या. पण, त्यांना जबर मार लागला. त्यानंतर पोलीस, अग्निशमन दल व नागरिकांच्या मदतीने महिलेला खदानीच्या बाहेर काढण्यात येऊन कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले.