शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

जळगावच्या तरुणाने सोशल मीडियावरुन मुंबईच्या तरुणीला पाठविले अश्लिल संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 1:25 AM

इन्स्टाग्रामवर या सोशल मीडिया नेटवर्कवर दुसºयाच्या नावाने अकाउंट तयार करुन मुंबईच्या तरुणीला अश्लिल मेसेज पाठविणाºया गौरव नरेंद्र राणे (रा.सुयोग कॉलनी, जळगाव) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या सायबर सेलने बुधवारी अटक केली. त्याच्याविरुध्द जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, राणे याआधीही असाच प्रकार केला होता, तेव्हा पिंपरी (पुणे) पोलिसांनीही त्याला अटक केली होती.

ठळक मुद्दे तरुणाला पोलिसांनी केली अटक  राष्टवादी विद्यार्थी कॉँग्रेसच्या पदाधिका-याच्या नावाने बनविले इन्स्टाग्रामवर अकाउंट याआधीही पुणे पोलिसांनी केली होती अटक

 

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,२९ : इन्स्टाग्रामवर या सोशल मीडिया नेटवर्कवर दुस-याच्या नावाने अकाउंट तयार करुन मुंबईच्या तरुणीला अश्लिल मेसेज पाठविणा-या गौरव नरेंद्र राणे (रा.सुयोग कॉलनी, जळगाव) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या सायबर सेलने बुधवारी अटक केली. त्याच्याविरुध्द जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, राणे याआधीही असाच प्रकार केला होता, तेव्हा पिंपरी (पुणे) पोलिसांनीही त्याला अटक केली होती.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गौरव राणे याने राष्टÑवादी विद्यार्थी कॉँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अखिल संतोष चौधरी (वय २९,रा. राधा किसनवाडी, जळगाव) यांच्या नावाने इन्स्टाग्रामवर या सोशल मीडिया नेटवर्कवर बनावट अकाऊंट तयार करुन त्यावर चौधरी यांचाच फोटो अपलोड केला होता. या अकाऊंटवरुन ९ जुलै रोजी चौधरी यांची मैत्रिण असलेल्या तरुणीला अश्लिल संदेश पाठविले होते. हा संदेश पाहून या तरुणीने दुसºया दिवशी चौधरी यांना विचारणा केली असता, आपण असा कोणताच संदेश पाठविला नसल्याचे स्पष्ट केले.  हा प्रकार कोणीतरी केल्याचे लक्षात आल्यानंतर चौधरी यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या सायबर सेलकडे तक्रार केली होती.चार महिन्यात मिळाले पुरावेआलेल्या तक्रारीवरुन सायबर सेलने माहिती तंत्रज्ञानाचा वापर करुन विविध कंपन्यांकडून माहिती मागविली असता हा प्रकार गौरव राणे यानेच केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांनी उपनिरीक्षक अंगत नेमाणे, श्रीकृष्ण पटवर्धन, दिनेश बडगुजर, संदीप सावळे व जयंत चौधरी यांच्या पथकाला तत्काळ त्याला अटक करण्याचे आदेश दिले. त्यानुसार या पथकाने दुपारी त्याला अटक केली व सायंकाळी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला माहिती तंत्रज्ञानाचा गैरवापर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.दुस-यांदा केला विकृतपणागौरव राणे याने यापूर्वीही गेल्यावर्षी असाच विकृतपणा केला होता. पिंपरी, पुणे येथील एका तरुणीला व्हॉटस्अ‍ॅपवर अश्लिल संदेश पाठविला होता. त्या तरुणीने पोलिसात तक्रार केल्यानंतर गौरवचे नाव पुढे आले होते. या प्रकरणात त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल होऊन पुणे पोलिसांनी अटक केली होती. त्यावेळी तो बराच दिवस कोठडीत होता असे पोलिसांनी सांगितले.