शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
5
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
6
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
7
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
8
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
9
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
10
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
11
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
13
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
14
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
16
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
18
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
19
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
20
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल

जळगाव जिल्हा परिषद अधिकाऱ्याची चौकशी

By admin | Published: March 26, 2017 2:38 AM

चोपडा येथील जिल्हा बँक शाखेत नोटा बदल प्रकरणात जिल्हा परिषदेतील उपमुख्य कार्यकारी अधिकारी नंदकुमार वाणी

जळगाव : चोपडा येथील जिल्हा बँक शाखेत नोटा बदल प्रकरणात जिल्हा परिषदेतील उपमुख्य कार्यकारी अधिकारी नंदकुमार वाणी यांच्यासह दोघा अधिकाऱ्यांची सीबीआयने शनिवारी चौकशी केली. तसेच या प्रकरणात एका बड्या व्यक्तीच्या चौकशीसाठी वॉरंटही सीबीआय पथकाने घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.वाणी यांची बांधकाम व इतर व्यवसायांमध्ये काही व्यक्तींसोबत भागीदारी असल्याचा व त्यांनी मोठा पैसा गुंतविल्याचा संशय केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) आहे. मोहनगरातील वाणी यांचे शेजारी ओम जांगीड व जि.प.तील स्थापत्य अभियांत्रिकी सहायक भूषण तायडे यांची शनिवारी चौकशी करण्यात आली. जांगीड यांची सकाळी ९ ते सायंकाळी पाच तर वाणी यांची सकाळी ११.१० ते दुपारी ३.१० पर्यंत चौकशी झाली. भूषण तायडे यांचीही दुपारी तीन तास चौकशी झाली. नोटाबदली प्रकरणाशी सुभाष चौक अर्बन को.आॅप. क्रेडीट सोसायटीचा संबंध असल्याप्रकरणी या सोसायटीचे सल्लागार भरत शहा यांचीही चार तास चौकशी झाली. हे प्रकरण आणखी कुणापर्यंत पोहोचते, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. वाणी व जांगीड यांना समोरासमोर काही प्रश्न विचारण्यात आले. चौकशीमधील कुठलाही तपशील समोर आलेला नाही. नंदकुमार वाणी यांचा मोबाईल सीबीआयच्या पथकाने जप्त केला आहे. तसेच चौकशीसंबंधी कुठलीही माहिती कुणाला सांगू नये, चौकशीसाठी सहकार्य करावे, अशा सूचना वाणी यांना दिल्या आहेत. (प्रतिनिधी)