जळगाव - जळगाव जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षांची निवड शुक्रवारी (3 जानेवारी) होत आहे. यासाठी चुरस वाढली आहे. बहुमतासाठी लागणारा 33 चा जादुई आकडा भाजपाकडे असल्याचा दावा केला जात आहे. तर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस महाविकास आघाडीकडे सदस्य नसले तरी जोर लावण्यात येत आहे.
भाजपाकडून अध्यक्षपदासाठी रंजना पाटील, पल्लवी सावकारे यांचे तर उपाध्यक्षपदासाठी मधू काटे अथवा लालचंद पाटील यापैकी एक नाव निश्चित केले जाण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेत 67 सदस्य आहेत. यापैकी 2 जण अपात्र आहेत. भाजपाने मागील कार्यकाळात काँग्रेसची मदत घेत सत्ता मिळविली होती. ही सत्ता कायम ठेवण्यासाठी आता एकनाथराव खडसे आणि गिरीश महाजन हे एकत्र आले आहेत.
सध्याचे पक्षीय बलाबल
एकूण सदस्य - 65
भाजप - 33
राष्ट्रवादी -15
शिवसेना - 13
काँग्रेस - 4
राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचा प्रत्येकी एक म्हणजे दोन सदस्य अपात्र आहेत.