जळगाव : निधी वाटपाच्या कारणावरून उपाध्यक्ष, सभापती व गटनेत्यांच्या राजकीय दबावामुळे सध्या जि.प.अध्यक्ष दबावात आहेत. अध्यक्षांकडून त्यांच्या कामाचे नियोजन मागितले जात असतांना उपाध्यक्ष किंवा सभापतींकडून मात्र त्यांच्या कामाचे नियोजन सांगितले जात नसल्याने विकास कामांचे नियोजन कोलमडले असल्याचा आरोप शिवसेनेच्या जि.प.सदस्या कल्पना संजय पाटील यांनी पत्रकारांशी बोलतांना केला.जिल्हा परिषद निवडणुकीनंतर भाजपाने सत्ता स्थापन केली. त्यानंतर सत्ताधारी सदस्यांना ६० टक्के तर विरोधी सदस्यांना ४० टक्के निधी वाटपाचे सूत्र ठरले होते. मात्र सद्या उपाध्यक्षांसह काही सभापती व गटनेते हे अध्यक्षांवर दबाव टाकत आहे. त्यामुळे काही सदस्यांना २५ ते ३० लाखांचा निधी दिला जात आहेत तर काहींना अवघा ५ ते ७ लाखांचा निधी दिली जात आहे.सिंचन विभागासाठी एक कोटी ९५ लाखांचा तर पाणी पुरवठा विभागातील २ कोटी १२ लाखांचे कामे ही विशिष्ट १६ जणांना मिळाल्याचा आरोप त्यांनी केला. सर्वसाधारण सभेत जे जिल्हा परिषद सदस्य बोलतात त्यांनाच निधी वितरीत केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
जळगाव जिल्हा परिषद अध्यक्षांवर राजकीय दबाव!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2018 8:41 PM
निधी वाटपाच्या कारणावरून उपाध्यक्ष, सभापती व गटनेत्यांच्या राजकीय दबावामुळे सध्या जि.प.अध्यक्ष दबावात आहेत.
ठळक मुद्देशिवसेनेच्या जि.प.सदस्या कल्पना पाटील यांचा आरोपअंतर्गत वादामुळे निधी वाटपाचे नियोजन कोलमडलेउपाध्यक्षांसह सभापतींकडून अडचणीत आणण्याचा प्रयत्न