आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. ११ - जिल्हा परिषदेच्या वर्ग तीन व चार कर्मचाºयांची जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया सुरू झाली असून सामान्य प्रशासन विभागाच्यावतीने पंचायत समितींकडून संवर्ग निहाय बदलीपात्र कर्मचाºयांचे प्रस्ताव १२ एप्रिल पर्यंत मागविले आहे. शिक्षक वर्ग वगळता प्रशासकीय,आपसी, विनंती व पेसा अंतर्गत बदल्या होणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे जि.प.मधील बदली प्रक्रिया गाजत असते. मात्र गेल्या दोन वर्षांपासून प्रशासनाने बदली प्रक्रीयेत समुपदेशन पध्दतीने सुरूवात केल्याने या गोंधळाला आळा बसला आहे. यंदाही बदली प्रक्रियेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून यासाठी सामान्य प्रशासन विभागाने जिल्ह्यातील गटविकास अधिकाºयांना आदेश पाठवून याद्या सादर करण्याचे सूचित केले आहे.जि.प.मध्ये वर्ग तीन व चारच्या कर्मचाºयांमध्ये ग्रामसेवक,आरोग्यसेवक, कृषी सहाय्यक, लिपिक व शिपाई वर्गीय कर्मचाºयांच्या बदल्या होणार आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत कर्मचारी हादरले आहेत.पंचायत समिती स्तरावरच्या बदल्यादेखील २५ मेपर्यंत पूर्ण होणार आहे. १२ एप्रिल पर्यंत त्यासाठी प्रस्ताव मागविण्यात आले असून २१ रोजी आक्षेप नोंदविण्यास मुदत देण्यात आली आहे. तालुकास्तरीय बदल्यांची अंतिम यादी २७ एप्रिल रोजी प्रसिद्ध होणार आहे.बदली प्रक्रीयेत ज्या कर्मचाºयाला एकाच ठिकाणी पाच वर्ष पूर्ण झाले आहे, अशा कर्मचाºयांसह ज्यांनी पेसा क्षेत्रात चार वर्ष काम केले आहे अशा कर्मचाºयांच्या विनंती बदल्या होणार आहे. यासह विधवा, परितक्त्या, अपंग, दुर्धर आजार यासह शासनाच्या नियमानुसार १० प्रकारच्या कर्मचाºयांना एक वर्षाच्या कालावधी नंतरदेखील विनंती बदली अर्ज करता येणार आहे. तसेच ज्या कर्मचाºयांना एकाच ठिकाणी १० वर्ष पूर्ण झाले आहे. अशा कर्मचाºयांच्या प्रशासकीय बदल्या होणार आहे. आपसी बदल्यांचे प्रस्ताव आल्यास त्यांच्यादेखील बदल्या होतील, अशी माहिती मिळाली.बदली प्रक्रिया वेळापत्रक- १२ एप्रिलपर्यंत गटविकास अधिका-यांकडून प्रस्ताव मागविणे- १७ पर्यंत संवर्गनिहाय सेवा जेष्ठता यादी सादर करणे- २७ पर्यंत हरकत व आक्षेप नोंदविणे- २ मेपर्यंत खाते प्रमुखाकडून यादी अंतिम करणे- ०५ मेपर्यंत उपमुख्य कार्यकारी अधिकाºयांकडून अंतिम यादी होईल- ३१ मेपूर्वी बदल्यांचे आदेश निर्गमित होतील
जळगाव जिल्हा परिषदेत बदली प्रक्रिया सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 12:39 PM
कर्मचाऱ्यांचे प्रस्ताव पाठविण्याची १२ एप्रिलपर्यंत मुदत
ठळक मुद्देशिक्षक वगळता वर्ग तीन व चार कर्मचा-यांच्या बदल्यांच्या समावेश३१ मेपूर्वी बदल्यांचे आदेश निर्गमित होतील