जळगाव : जिल्हा नियोजनकडून प्राप्त निधीतून सर्व सदस्यांना समान वाटप व्हावे, या मागणीवरून निर्माण झालेला तिढा अद्यापही सुटलेला नसून उद्या होणाऱ्या सर्वसाधारण सभेत वादळाचे संकेत काही सदस्यांच्या पवित्र्यांमुळे निर्माण झाले होते मात्र, अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांच्या दालनात बैठक होऊन आश्वासन मिळाल्याने वादाचे वादळ टळल्याचे सांगितले जात आहे.भाजपने सत्तधारी सदस्यांना वीस लाखांच्या निधीचे आश्वासन दिले होते़ मात्र ते आता प्रशासकीय पातळीवर शक्य नसल्याने त्याबाबचे पत्र देण्यास या सदस्यांना नकार देण्यात आल्याने या सदस्यांनी पुन्हा एकदा आक्रमक पावित्रा घेतला होता सभेवर बहिष्कार टाकण्याच्या पवित्र्यात काही सदस्य होते़ यासाठी आधी बांधकाम सभापती रजनी चव्हाण यांच्या दालनात काही सदस्यांची बैठक झाली त्यानंतर अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांच्या दालनात सभा घेण्यात आली़ यावेळी अधिकाऱ्यांनाही बोलावण्यात आले होते़ मात्र, या बैठकीत अध्यक्षांनी कामांबाबतचा अहवाल मागवून पत्र देण्याबाबत आश्वासन दिल्याने सदस्य शांत झाल्याचीही माहिती आहे़बैठकीला ओळखपत्र आवश्यकसर्वसाधरण सभेला होणारी गर्दी व त्यामुळे बैठकीत येणारे अडथळे लक्षात घेता सर्व अधिकारी कर्मचारीयांच्यासह माध्यम प्रतिनिधींना प्रथमच या बैठकीला ओळखपत्र सक्तिचे करण्यात आले आहे़ ओळपत्र नसल्यास सभेला बसता येणार नाही, असे आदेशच काढण्यात आले आहे़
जळगाव जि़ल्हा परिषदेतील समान निधीचा तिढा : सर्वसाधारण सभेतील वादळ टळले ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2019 12:33 PM