जळगाव : जिल्हा परिषदेच्या विषय समिती एक व दोन सह रिक्त झालेल्या समिती सदस्यांच्या निवडीसाठी जिल्हा परिषदेच्या शाहू महाराज सभागृहात मंगळवार २८ रोजी दुपारी २ वाजता विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे़ पक्षपातळीवर एक मत झाल्यास अर्धातासातही ही सभा आटोपू शकते अन्यथा चार दिवस ही मतदान प्रक्रिया चालण्याची शक्यता आहे़ त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने खबरदारी म्हणून मतदानाचेही नियोजन केले आहे़समाज कल्याण सभापती म्हणून जयपाल बोदडे, महिला व बालकल्याण समिती सभापती म्हणून ज्योती पाटील यांची निवड झालेली आहे़ आता शिक्षण अर्थ, आरोग्य, बांधकाम, पशुसंवर्धन आदी समित्यांचे उपसभापती लालचंद पाटील तसेच उज्ज्वला माळके तसेच रवींद्र पाटील यांच्यात यापैकी कोणते खाते जाणार हे मंगळवारी स्पष्ट होणार आहे़ बांधकाम व अर्थ उपाध्यक्ष लालचंद पाटील यांच्याकडे तर शिक्षण व आरोग्य रवींद्र पाटील व कृषी व पशुसंवर्धन उज्ज्वला माळके यांच्याकडे जाण्याची चिन्हे आहेत़२३ सदस्यांची होणार निवडस्थायीच्या एक सदस्यांसह विविध समित्यांची अशा २३ सदस्यांचीही निवड केली जाणार आहे़ यात दोन सदस्य अपात्र झाले आहेत त्यासह पंचायत समितीच्या पंधरा सभापतींची नव्याने निवड झालेली असून त्यांची व जि़ प़ चे जे सदस्य पदाधिकारी झालेत त्यांची अशा सदस्यांची ही निवड होणार आहे़ यात एकापेक्षा अधिक उमेदवार उभे राहिल्यास गुप्त पद्धतीने मतदान घेण्यात येईल व यासाठी किमान तीन ते चार दिवसांचा अवधी लागू शकतो, अशी माहिती आहे़सभापती निवडीत झालेल्या नाट्यमय घडामोडीनंतर आता समिती वाटपातही काही नाट्यमय घडामोडी घडतील का? यामुळे सर्वांचे या सभेकडे लक्ष लागून आहे़
जळगाव जि.प. विषय समिती सदस्य निवडीसाठी लागणार चार दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 12:05 PM