शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
2
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
3
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
4
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
5
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
6
TATA IPL Auction 2025 Live: भारतीय खेळाडूंचा लिलावात बोलबाला; पंत, अय्यर अन् चहल यांच्यावर पैशांचा पाऊस
7
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
8
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
9
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
10
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
11
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
12
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
13
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
14
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
15
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
16
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
17
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
18
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...
19
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड

जळगाव जि़ प़ मालकीचे १८ गाळे खाली करण्याच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 12:37 PM

लवकरच कायदेशीर बाबींची पूर्तता करून कारवाई

जळगाव : जिल्हा परिषदेच्या मालकीची जळगाव शहरातील मुदत संपलेली १८ गाळे न्यायालयाच्या निर्णयानंतर खाली करण्याच्या हालचाली जि़ प़ प्रशासनोन सुरू केल्या आहेत़ या प्रकरणातील वकील बदलण्यात आले असून नवीन वकीलांचे मत घेऊन लवकरच गाळेधारकांना नोटीस बजावण्यात येणार असल्याचे बांधकामचे कार्यकारी अभियंता शरद येवले यांनी सांगितले़जळगाव शहरात पशुवैद्यकीय दवाखान्याच्या जवळ जिल्हा परिषदेच्या मालकीचे एकूण वीस गाळे होते़ या गाळ्यांची मुदत संपूण दहा वर्षांच्या वर कालावधी उलटूनही ती खाली करण्यात आलेली नाही़ यापैकी दोन गाळे खाली करण्यात आली होती़ दरम्यान, शासनाच्या विरोधात गाळेधारकांनी जिल्हा न्यायालयात अपील केले होते़ ते न्यायालयाने दीड महिन्यापूर्वी निकाली काढत शासनाला कायदेशीर बाबींची पूर्तता करून मग गाळे खाली करावे, असे सूचित केले आहे़ दरम्यान, आधीच्या वकीलांची कामगिरी समाधानकारक नसल्यामुळे त्यांना बदलविण्यासाठी विभागातूनच निर्णय झाला होता, त्यानुसार सीईओंच्या आदेशानुसार वकील बदलण्यात आल्याची माहिती येवले यांनी दिली़ आधी अ‍ॅड़ अनिल नेमाडे यांनी जिल्हा परिषदेची बाजू मांडली होती़ नवीन वकीलांच्या सल्ल्यांनुसार आता पुढील कारवाई करू, आचारसंहिता संपण्याआधीच कारवाई केल्यास सोयीचे राहिल, असा सूरही उमटला असून लवकरच याबाबत कारवाई केली जाईल, असेही येवले यांनी सांगितले आहे़ कोट्यवधींची थकबाकी असल्याने शासनाचे नुकसान होत असून हा विषय वांरवार विविध बैठकांमध्येही समोर आला होता़ दरम्यान, गेल्या सर्वसाधारण सभेत जिल्हाभरातील जिल्हा परिषदेच्या मालमत्ता व त्या ठिकाणच्या भंगाराचा लिलाव करावा अशी मागणीही सदस्यांनी केली होती़ मात्र जिल्हाभरात जिल्हा परिषदेच्या अशा मालमत्ता किती याची माहिती ग्रामपंचायत विभागाकडे नव्हती, याबाबत आढावा घेण्याचे आदेशही उपाध्यक्षांनी दिले होते़ या गाळ्यांमधून जिल्हा परिषदेला मोठे उत्पन्न मिळणार असल्याने याकडे प्रशासनाने गांभिर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी होती़

टॅग्स :Jalgaonजळगाव