विलास बारी / ऑनलाईन लोकमतजळगाव, दि.29 - हवामान विभागाने पाच दिवस अतिवृष्टीचा अंदाज वर्तविला आहे. मुंबई, पुणे आणि कोकणात पावसाने कहर केला असताना तीन महिने उलटल्यानंतरही जळगाव जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या केवळ 56 टक्के पाऊस झाल्याने जळगावकरांवर पावसाचा रुसवा कायम आहे. जिल्ह्यातील 8 लघु प्रकल्पांमध्ये अजूनही 50 टक्क्यांच्या आत जलसाठा आहे.हवामान विभागाने सर्वत पाच दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. सोमवारी रात्री जळगाव जिल्ह्यातील जामनेर, एरंडोल, मुक्ताईनगर आणि रावेर या तीन तालुक्यांमध्ये चांगला पाऊस झाला. तर अन्य ठिकाणी तुरळक पाऊस झाला.
तीन महिन्यात सरासरीच्या 56 टक्के पाऊसजळगाव जिल्ह्यात पावसाळ्यात वार्षिक सरासरी पजर्न्यमान हे 663.3 टक्के होत असतो. मात्र तीन महिन्यांचा कालावधी झाला असताना आतार्पयत केवळ 370.7 मिमी पाऊस झालेला आहे. सरासरीच्या केवळ 56 टक्के पाऊस आतार्पयत झालेला आहे. यात सर्वाधिक 70.7 मिमी पाऊस हा पारोळा तालुक्यात तर सर्वात कमी 37 मिमी पाऊस हा अमळनेर तालुक्यात झालेला आहे.
नाशिकमधील पजर्न्यवृष्टीचा गिरणेला लाभकाही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्याने त्याचा लाभ गिरणा धरणाला होत आहे. त्यामुळे 29 ऑगस्टर्पयत या धरणात 55.64 टक्के जलसाठा झाला आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट अखेर या धरणात 67.30 टक्के जलसाठा होता. यावर्षी वाघूर धरणात 64.47 टक्के तर हतनूर धरणात 66.12 टक्के जलसाठा आहे.8 लघुप्रकल्पांमध्ये ठणठणाटपावसाळ्याचे तीन महिने उलटल्यानंतरही जळगाव जिल्ह्यातील 8 लघुप्रकल्पांमध्ये ठणठणाट आहे. त्यात अग्नावती, हिवरा, बहुळा, भोकरबारी, बोरी व मन्याड या प्रकल्पांमध्ये अजूनही शून्य टक्के जलसाठा आहे. तर अंजनी 3.62 टक्के, गुळ धरण 35.26 टक्के, मोर धरणात 49.17 टक्के जलसाठा आहे. अभोरा, सुकी, तोंडापूर धरणात 50 टक्क्यांच्या वर जलसाठा आहे. तर मंगरुळ हा एकमेव लघुप्रकल्प 100 टक्के भरलेला आहे.
10 टक्के पाऊस घटलागेल्यावर्षी 29 ऑगस्टर्पयत जिल्हाभरात 67.5 टक्के पाऊस झाला होता. या कालावधीत सरासरीच्या 446.9 मिमी पाऊस झालेला होता. मात्र यावर्षी त्यात तब्बल 10 टक्के घट झाली आहे. यावर्षी सरासरीच्या 370.7 मिमी पाऊस झाला असून केवळ 56 टक्के पाऊस झाला आहे. काही ठराविक अंतराने पाऊस होत असल्याने जिल्ह्यातील खरीप हंगामाला काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी अजूनही विहिरींमध्ये पुरेसा जलसाठा झालेला नाही. मध्यम व लघुप्रकल्पांत पाणी नसल्याने अनेक गावांमध्ये भर पावसाळ्यात पाणी टंचाई जाणवत आहे.