जळगाव : जळगाव शहरातून जाणा:या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर अपघात होऊन निरपराधांचे बळी जाणे नित्याचेच झाले असल्याने यावर उपाययोजना म्हणून तातडीने समांतर रस्त्यांचा विकास करण्यात यावा, या मागणीकडे लोकप्रतिनिधी व सरकारी यंत्रणांचे लक्ष वेधण्यासाठी ‘जळगाव फस्र्ट’ या अराजकीय मंचच्या वतीने महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त 30 जानेवारी रोजी शांततामय मार्गाने आयोजित पदयात्रेत मोठय़ा संख्येने जळगावकरांनी सहभाग घेत तब्बल आठ कि.मी. पायी चालत आपला असंतोष व्यक्त केला. समांतर रस्त्यासाठी मोठय़ा संख्येने रस्त्यावर उतरलेल्या जळगावकरांसोबत साठ संस्थांचे पदाधिकारी, सदस्य, आमदार, महापौर, उपमहापौर यांच्यासह आजी-माजी लोकप्रतिनिधी, महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला सहभागी झाल्या होत्या. पदयात्रेच्या समारोपप्रसंगी सर्वपक्षीय नेत्यांनी उपस्थिती देऊन आपापली जबाबदारी पार पाडू असे अभिवचन दिले. महामार्गालगत समांतर रस्ते नसणे, सुरक्षित महामार्ग क्रॉसिंग नसणे, रहदारीचे नियम व्यवस्थित न पाळणे इत्यादी कारणांनी तरुण, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आदींचा मृत्यू महामार्गावरील अपघातांमुळे झाला आहे. नशिराबाद नाका ते बांभोरी गिरणा पूल या दहा किलोमीटर अंतरात समांतर रस्ते विकसित नसल्यामुळे सर्वच वाहनांना महामार्गाचा वापर करावा लागतो. परिणामी मार्गावर अपघातांची संख्या वाढली आहे. त्यामुळे समांतर रस्त्यांचा विकास करून या अपघातांना आळा बसावा या मागणीसाठी ‘जळगाव फस्र्ट’ संघटनेचे प्रणेते डॉ. राधेश्याम चौधरी यांनी पुढाकार घेत हा गांधी मार्च आयोजित केला होता. वैशिष्टय़े.. 4वेळेवर पदयात्रा सुरू, काटेकोर वेळेचे पालन49.30 वाजता अजिंठा चौफुलीपासून सुरुवात होऊन न थांबता खोटेनगरला पदयात्रा पोहचली4पदयात्रेत सर्व जण शिस्तीत रांगेत चालून रहदारीला सहकार्य 4घोषणा न देता शांततामय पदयात्रा 4हातात फलक घेऊन आपले म्हणणे मांडत मार्गक्रमण4वाहनावरील लाऊडस्पीकरवरील देशभक्तीपर गीतांनी प्रोत्साहन ‘लोकमत’चा अंक सभेतराष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असल्याने अनेकांना जीव गमवावा लागत आहे. महामार्गावरील ताण कमी व्हावा व अपघात टळावेत यासाठी समांतर रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागणे आवश्यक आहे. या समांतर रस्त्याच्या रेंगाळलेल्या प्रक्रियेस गती यावी यासंदर्भात ‘लोकमत’ पाठपुरावा करीत आहे. याविषयी ‘लोकमत’ने 30 जानेवारी रोजी विशेष पान प्रसिद्ध करून अपघात व बळींची संख्या देत या प्रश्नाविषयी गांभीर्य मांडले आहे. या पाठपुराव्याविषयी पदयात्रेच्या समारोपप्रसंगी झालेल्या सभेत ‘लोकमत’चा अंकच सभेत दाखविण्यात आला. या वेळी हा प्रश्न किती गंभीर आहे, हे वक्त्यांनी आपल्या मनोगतातून सांगितले. आमदार, लोकप्रतिनिधीही पायीपदयात्रेत सामान्य जळगावकरांसोबत लोकप्रतिनिधीही अजिंठा चौफुली ते खोटेनगर थांब्यार्पयत पायीच चालत सहभागी झाले होते. यामध्ये आमदार सुरेश भोळे, महापौर नितीन लढ्ढा, उपमहापौर ललित कोल्हे यांचा समावेश होता. याव्यतिरिक्त आमदार चंदूलाल पटेल हे प्रभात चौकातून सहभागी झाले होते.अन्यथा साखळी उपोषणजळगावातील लोकप्रतिनिधी हा प्रश्न मार्गी लावू शकत नसल्याचे चित्र आहे. 4 रोजीच्या सभेनंतरही हा प्रश्न मार्गी लागला नाही तर विविध संघटनांचे पदाधिकारी साखळी उपोषणास बसतील, असा इशारा समारोपप्रसंगी देण्यात आला.
समांतर रस्त्यासाठी जळगावकर रस्त्यावर
By admin | Published: January 31, 2017 12:16 AM