कोट...
जळगावची स्वादिष्ट केळी भौगोलिक मानांकनाद्वारे प्रथमतः दुबईत रवाना झाल्याचा सार्थ अभिमान असून, केळी उत्पादक शेतकऱ्यांनी परंपरागत पद्धती सोडून केळी निर्यातीचे फळनिगा तंत्रज्ञान आत्मसात केल्यास कमी उत्पादन खर्चात प्रतिखोड जास्त उत्पन्न व नफा कमावण्याची सुवर्ण संधी आहे.
- प्रा. डॉ. महेश महाजन, प्रमुख व वरिष्ठ संशोधक, कृषी विज्ञान केंद्र, पाल.
कोट...
" टिश्यूकल्चर तंत्रज्ञान व फळनिगा तथा ठिबक सिंचन तंत्रज्ञानाद्वारे भारतभर वाढलेल्या केळी उत्पादनामुळे जळगाव तथा खान्देशची केळी बाजारपेठेतील हुकूमत संपुष्टात येऊ पाहत होती; मात्र जळगावच्या भौगोलिक मानांकनामुळे सबंध भारतातील केळीपेक्षा आपल्या स्वादिष्ट व रूचकर केळीची अविट प्रतिमा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वाढीस लागणार आहे.
- सदानंद महाजन, शासन पुरस्कृत शेतीनिष्ठ शेतकरी, तांदलवाडी.
कोट...
" भौगोलिक मानांकनाद्वारे केळी निर्यातीचा पहिला बहुमान आम्ही पटकावला असला तरी ॲपेडाने केळी क्लस्टरद्वारे फळनिगा तंत्रज्ञानासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण व अनुदान उपलब्ध करून कोल्ड स्टोरेज तथा पॅकेज हाऊसची उभारणी केल्यास भौगोलिक मानांकनाद्वारे जागतिक बाजारपेठेत कळस गाठणे शक्य होईल. दुबईपाठोपाठ युरोप निर्यातीसाठी अत्यावश्यक असलेला गुणात्मक दर्जा केळी उत्पादनात प्राप्त करून केळीची युरोपवारी करण्याचे उद्दिष्ट आहे.
-प्रशांत महाजन, संचालक, महाजन बनाना, तांदलवाडी.