ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. 27 - साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय्य तृतीयाच्या पूर्वसंध्येला जळगावला बाजारात खरेदीसाठी प्रचंड गर्दी झाली होती. दुचाकी खरेदीसाठी अनेकांनी हा मुहूर्त निवडला असून, जवळपास 550 दुचाकींची नोंदणी झाली आहे. यंदा कोटय़वधींची उलाढाल होईल, असा अंदाज बाजारपेठ विश्लेषकांचा आहे. घागरसह केळीची पाने, आंबे, डांगरला मोठी मागणीअक्षय्यतृतीयेला ग्रामीण भागात आखाजी म्हटले जाते. यानिमित्त घागर भरून तिची पूजा केली जाते. या पूजेच्या वेळेस डांगर घागरीवर ठेवलेले असते. तसेच कारंज्या, आंब्याचा रस, पुरणपोळी असा गोडधोड जेवणाचा कार्यक्रम असतो. केळीच्या पानांवर जेवण्याची परंपराही आहे. त्यामुळे घागरसह केळीची पाने, आंबे, डांगर, रामफळ आदींच्या खरेदीसाठी बाजारामध्ये ग्राहकांची मोठी गर्दी झाली होती.केळीच्या पानांचा तुटवडा जळगावातील घाणेकर चौक, सुभाष चौक, फुले मार्केट परिसरात घागर, केळीची पाने विक्रेत्यांची मोठी गर्दी झाली होती. सायंकाळर्पयत बाजारपेठेत गर्दी होती. दुपारी प्रचंड उष्णता असल्याने अनेक चाकरमानी, गृहिणी सायंकाळी खरेदीसाठी बाहेर पडले. केळीची पाने मात्र पुरेशी नसल्याने त्यांची टंचाई होती. 10 रुपयात 8 पानांची सकाळच्या वेळी विक्री झाली. रिधूर, किनोद, खेडी खुर्द, डांभुर्णी, भोकनी, आव्हाणी आदी भागातून केळीची पाने विक्रेत्यांनी आणली होती. 550 दुचाकींची बुकिंगशहरातील विविध दुचाकी शो रूम्सकडे 550 दुचाकींची बुकिंग झाली असून, रोखीच्या स्वरुपातही अनेकजण दुचाकींची आखाजीला खरेदी करतील, असे चित्र आहे. घागर, आंब्यांसह इतर बाबींचे दरघागर-किमान 40 रुपयांपासून, रामफळ-80 ते 100 रुपये किलो, टरबूज- 15 रुपये किलो, डांगर- 20 ते 40 रुपये नग. आंबा - गावराणी - 60 ते 80, हापूस-450 रुपये डझन, तोतापुरी - 80 ते 100 रुपये किलो, बदाम - 40 ते 50 रुपये किलो. यंदाच्या अक्षयतृतीयेला आमच्याकडे दुचाकींची बुकींग ब:यापैकी वाढली आहे. मागील वेळेस दुष्काळी स्थिती होती.यंदा सर्व प्रकारच्या दुचाकींना मागणी आहे. 150 दुचाकींची बुकींग आमच्याकडे झाली आहे. -अमित तिवारी, व्यवस्थापक
अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी जळगावची बाजारपेठ फुलली
By admin | Published: April 27, 2017 6:52 PM