लॉकडाऊनचा गांभिर्याने विचार करावा लागेल : जिल्हाधिकारी अभिजित राऊत
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रुग्णांची वाढती आकडेवारी बघता प्रशासन लॉकडाऊनचा गांभिर्याने विचार करत आहे; मात्र सध्या चाचण्यांची संख्या वाढल्याने रुग्णसंख्यादेखील वाढली आहे, तसेच पॉझिटिव्हिटी रेट हा १२ ते १५ टक्क्यांच्या मध्ये असल्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
ते म्हणाले की, होळीसंदर्भात शासनाचे जे काही नियम लागू करण्यात आले आहेत, त्याचे पालन नागरिकांनी करावे, तसेच गेल्या काही दिवसांत वाढलेली रुग्णसंख्या आणि मृत्यूचे प्रमाण पाहता प्रशासन गांभिर्याने लॉकडाऊनचा विचार करत आहे; मात्र त्यासाठी नागरिकांना पूर्वसूचनादेखील देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.