जळगाव : मनुदेवीच्या दर्शनासाठी गेलेल्या अशोक गोपाळ सोनवणे (३२, रा. तुकारामवाडी, जळगाव) या तरुणाचा नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी दोन वाजता मनुदेवी, ता.यावल येथे घडली. मनुदेवीच्या दर्शनापूर्वी अंघोळ करण्याचा मोह अशोकला घातक ठरला.पाण्यात उतरण्यास मित्रांनी त्याला विरोध केला होता, मात्र त्याने ऐकले नाही...आणि काही क्षणातच होत्याचे नव्हते झाले.तुकारामवाडी येथील अशोक सोनवणे हा मित्र भावेश चौधरी, उल्हास पिंपळकर, सिध्दांत पाटील, उमेश पाटील आणि शरद सोनवणे यांच्यासमवेत मंगळवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास मनुदेवी येथे दर्शनासाठी जाण्यास दुचाकीने निघाला. दुपारी २ वाजेच्या सुमारास मनुदेवी परिसरात सर्व मित्र पोहचले. मनुदेवी पोहचण्यापूर्वी जोरदार सुरु असलेल्या पावसामुळे मार्गात असलेल्या सातही पुलावरुन नदीप्रमाणे पाण्याचा प्रवाह असतो. यातील दुसºया क्रमांकाच्या पुलावर अशोकसह मित्र पोहचले. याठिकाणी अशोकने पाण्यात उभा असतांना त्याच्या मोबाईलमध्ये मित्रांना फोटो काढायला लावला. याचवेळी अशोकने अंघोळीचा आग्रह धरला होता, मात्र मित्रांनी त्याला विरोध केला होता. दरम्यान मोबाईलमध्ये अशोकने काढलेला फोटो त्याचा शेवटचा फोटा ठरला. पश्चात आई लिलाबाई, वडील गोपाल सोनवणे, पत्नी मोनी, मोठा भाऊ संतोष तसेच एक बहिण असा परिवार आहे. भाऊ संतोष हा सेटींगच्या कामाला जाऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. वडील हातमजुरी करतात. अशोकच्या मृत्यूचा कुटुंबियांना धक्का बसला.
मनुदेवीच्या दर्शनाला गेलेल्या जळगावाच्या तरुणाचा नदीत बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2019 9:36 PM
मनुदेवीच्या दर्शनासाठी गेलेल्या अशोक गोपाळ सोनवणे (३२, रा. तुकारामवाडी, जळगाव) या तरुणाचा नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी दोन वाजता मनुदेवी, ता.यावल येथे घडली. मनुदेवीच्या दर्शनापूर्वी अंघोळ करण्याचा मोह अशोकला घातक ठरला.पाण्यात उतरण्यास मित्रांनी त्याला विरोध केला होता, मात्र त्याने ऐकले नाही...आणि काही क्षणातच होत्याचे नव्हते झाले.
ठळक मुद्दे यावल तालुक्यातील मनुदेवीची घटनामित्रांसोबतचा फोटो ठरला शेवटचामित्रांनी केला होता विरोध