ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 27 - शेतातील पिकांचे आणि अन्नधान्याचे नुकसान करणा:या उंदरांचा नायनाट करणारा साप हा मानवाचा मित्र असला तरी वाढत्या शहरीकरणामुळे सापांचा अधिवास धोक्यात आला आहे. साप हा मानवासाठी धोकेदायक असल्याच्या भावनेतून सापाला मारण्याचे प्रमाण वाढत आहे. मात्र शेतक:यांसह संपूर्ण मानवासाठी साप वाचविणे गरजेचे ठरत आहे. याच विचारातून पुढाकार घेतलेल्या जळगावातील वन्य जीव संरक्षण संस्थेच्या कार्यकत्र्यानी वर्षभरात विविध जातीचे 944 साप वाचविले. जिल्ह्यात आढळणारे सर्पनाग, मण्यार, घोणस, फुरसे, धामण, दिवड, तस्कर, रुका सर्प, कवडय़ा, डुरक्या, धूळनागीण, कुकरी, अंडी खाणारे, रेती सर्प, मांज:या, गवत्या, अजगर. अशी घ्या काळजीकुटुंबातील लोकांना, पाळीव प्राण्यांना घराबाहेर काढावे. स्वत: साप पकडण्याचा प्रय} करू नये. सापाला हुसकावून लावताना लांब काठी, तारेचा आकडा अशा गोष्टींचा वापर करून घरापासून लांब सोडावे.भीतीने मृत्यू बिनविषारी सर्प चावल्याने कधीही मृत्यू येत नाही. केवळ सर्पाने आपल्याला चावा घेतला आणि आपला मृत्यू होणार या कल्पनेने मानसिक धक्का बसून बाधित व्यक्ती बेशुद्ध होते किंवा हृदयक्रीया बंद पडून व्यक्तीचा मृत्यू होतो. जळगावातील वन्यजीव संरक्षण संस्थेच्यावतीने ऑगस्ट 2016 ते जुलै 2017 या वर्षभरात तब्बल 944 सापांना पकडून त्यांना सुरक्षित स्थळी हलविले.
या सापांना वाचविलेनाग - 233, मण्यार - 28, घोणस - 27, फुरसे - 3, धामण- 202, दिवड - 161, तस्कर - 73, रुका सर्प - 18, कवडय़ा - 76, डुरक्या - 53, धूळनागीण - 36, कुकरी - 20, अंडी खाणारे- 1, रेती सर्प - 3, मांज:या - 4, गवत्या 3, अजगर- 3.धान्याचे 35 टक्के नुकसान उंदरामुळे होते. तसेच विविध आजारही उंदरांमुळेच होत असतात. उंदरांच्या संख्येवर सापामुळे नियंत्रण येते. त्यामुळे मानवाचा मित्र ठरणा:या सापाला वाचविणे गरजेचे आहे. यासाठी सर्पमित्रांशी संपर्क साधून सापांना वाचविण्याचा प्रयत्न करा. -वासुदेव वाढे, वन्यजीव संरक्षण संस्था.