जळगाव : निवडणूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी प्रशासनाने दिलेल्या तक्रारीवरुन भाजपचे पाच, शिवसेनेचे एक व एका अपक्ष उमेदवाराविरुध्द रविवारी शहर, शनी पेठ व रामानंद नगर पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.विना परवानगी प्रचार कार्यालय सुरु करणे, प्रचार पत्रकावर मुद्रकाचे नाव न छापणे तसेच प्रकाशकाचे नाव अपूर्ण छापल्याप्रकरणी प्रभाग एकमधील अ चे भाजपाचे उमेदवार प्रिया मधुकर जोहरे, ब मधील उमेदवार सरिता अनंत नेरकर, क मधील उमेदवार दिलीप बबनराव पोकळे व ड मधील उमेदवार खान रुकसानाबी गबलु खान यांच्याविरुध्द शहर पोलीस स्टेशनला लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १५१ चे १२७ अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसºया प्रकरणात प्रभाग १४ मधील ब च्या भाजपाच्या उमेदवार मोहिनी सुरेश सूर्यवंशी व ड मधील अपक्ष उमेदवार संग्रामसिंग सुरेशसिंह सूर्यवंशी यांनी निवडणूक अधिकाºयांची परवानगी न घेता संपर्क कार्यालय सुरु केले, तसेच भावना मुकेश टेकवानी यांच्या घरात मुद्रक व प्रकाशकाचे नाव नसलेले डिजीटल बॅनर लावल्याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.शिवसेनेचे प्रभाग चार ब मधील शिवसेनेचे उमेदवार शिवचरण कन्हैय्या ढंढोरे यांनी मतदारांसाठी अभिवादनपर पत्रक छापून वाटप केले, त्यावरही प्रकाशकाचे नाव नसल्याने शनी पेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
जळगाव मनपा निवडणूक : भाजप व शिवसेनेच्या ७ उमेदवारांविरुध्द गुन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 1:06 PM
निवडणूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी प्रशासनाने दिलेल्या तक्रारीवरुन भाजपचे पाच, शिवसेनेचे एक व एका अपक्ष उमेदवाराविरुध्द रविवारी शहर, शनी पेठ व रामानंद नगर पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ठळक मुद्देनियमांचे उल्लंघन करणाऱ्या अपक्षांवरही कारवाईआचारसंहितेच्या नियमांचे उल्लंघनरामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल