जळगाव : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी बुधवारी शहरातील संवेदनशील भागांना भेटी देऊन तेथील मतदान केंद्रांची पाहणी केली. शहर पोलीस स्टेशन, शनी पेठ व एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील १५ इमारतीतील ७५ केंद्रांना कराळे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी जागेवरच बंदोबस्ताची आखणी करुन काय खबरदारी घ्यावी याबाबतच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या.महापालिकेसाठी १ आॅगस्ट रोजी मतदान होत आहे. यासाठी पोलीस दलातर्फे बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. नाशिक परिक्षेत्रातील धुळे, नंदूरबार, नाशिक व अहमदनगर या चार जिल्ह्यातून बंदोबस्तासाठी अतिरिक्त कुमक व राखीव दलाची तुकडी मागविण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक कराळे यांनी ‘लोकमत’ ला दिली.या भागात केली पाहणीशहरातील एकुण मतदान केंद्र व त्यातील संवेदनशील मतदान केंद्र याबाबतचा आढावा घेण्यासाठी पोलीस अधीक्षक कराळे यांनी बुधवारी स्वत:च शहरातील इस्लामपुरा, शनी पेठ, कोळी पेठ, बालाजी पेठ,भीलपुरा, गेंदालाल मील, शिवाजी नगर, तांबापुरा, मास्टर कॉलनी, अक्सा नगर,मेहरुण, ख्वॉजामिया यासह अन्य संवेदनशील भागात जाऊन तेथील मतदान केंद्रांची पाहणी केली. यावेळी त्यांच्या सोबत अपर पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, उपअधीक्षक सचिन सांगळे व संबंधित पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी होते. त्याशिवाय शीघ्र कृती दल, राखीव दलाचे कर्मचारी यांचा ताफा होता. एक प्रकारे संवेदनशील भागात पोलिसांचे पथसंचलनच झाले.संवेदनशील उमेदवार व केंद्राची घेतली माहितीसंवेदनशील भागात जाताना कराळे यांनी केंद्र संवेदनशील आहे की तेथील उमेदवार याबाबतची माहिती प्रभारी अधिकाºयांकडून घेतली. केंद्र व उमेदवार संवेदनशील असेल तर त्याचा इतिहास काय? याची माहिती घेऊन त्या पध्दतीने जागेवरच बंदोबस्ताची आखणी केली. मतदान केंद्रात अधिकारी व कर्मचारी किती असतील, बॅरिेगटस् कुठे असतील, मतदान केंद्राबाहेर बंदोबस्त कसा असेल, व्हिडीओ चित्रण व सीसीटीव्ही कॅमेरे याबाबत कराळे यांनी सांगळे यांना सूचना केल्या. दहा अकरा ते दुपारी तीन अशी पाच तास कराळे यांनी पाहणी केली.निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी बंदोबस्ताची आखणी करण्यात आलेली आहे. संवेदनशील केंद्रांना भेटी देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. या भागात आणखी पथसंचलन केले जाणार आहे. या भागात २८ तारखेपासून गस्तही वाढविली जाणार आहे.-दत्तात्रय कराळे, पोलीस अधीक्षक
जळगाव मनपा निवडणूक : ७५ संवेदनशील मतदान केंद्रांच्या बंदोबस्ताची जागेवरच आखणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 12:36 PM
पोलीस अधीक्षकांकडून केंद्रांना भेटी
ठळक मुद्दे नाशिक परिक्षेत्रातून मागविला बंदोबस्तसंवेदनशील उमेदवार व केंद्राची घेतली माहिती