जळगाव : सोमवारी सकाळपासूनच प्रचाराचा धुमधडाका सुरु झाल्यानंतर सायंकाळीपर्यंत सर्व पक्षांनी मतदारापर्यंत पोहचण्याठी पुरेपुर प्रयत्न केले. मात्र, पाच वाजता प्रचार तोफा थंडावल्यानंतरदेखील सायंकाळी काही पक्षांच्या कार्यालयांमध्ये उमेदवारांसह कार्यकर्त्यांची गर्दी दिसून आली.गेल्या आठवडाभरापासून सुरु असलेल्या प्रचारसभा, रॅली आणि सोमवारी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सर्वच पक्षांनी जंगी प्रदर्शन करुन मतदारांशी संपर्क साधला. निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार ठीक सायंकाळी ५ वाजता शहरातील सर्व राजकीय पक्षांच्या कार्यालयासमोर लागलेले उमेदवारांचे बॅनर, वाहनांवरील झेंडे उतरविण्यात आले होते. सकाळपासून निघालेल्या भाजपा,शिवसेनेच्या प्रचार रॅल्या सायंकाळी दुपारपर्यंत पक्ष कार्यालयात परतल्या होत्या. तर या रॅलीबरोबर कार्यकर्तेदेखील प्रभागात न जाता पक्ष कार्यालयांमध्ये तर घराकडे रवाना झाले.कार्यकर्त्यांसोबत उमेदवारांच्या काही वेळ गुप्त बैठका चालू होत्या. तर काही कार्यकर्ते बाहेरच थांबून होते. बैठक झाल्यानंतर थोड्या वेळाने काही कार्यकर्ते कार्यालयातून निघून, आपल्या वाहनांनी टॉवर चौकाकडे तर काही रिंगरोडकडे रवाना झालेले दिसून आले. विशेष म्हणजे उमेदवारांची वाहने कार्यकर्त्यांच्या ताब्यात दिसून आली. सायंकाळी सातनंतर आणखी काही उमेदवार पुन्हा पक्ष कार्यालयात दाखल झाले होते.कार्यकर्त्यांकडून मतदारांशी संपर्कसायंकाळी प्रचार संपल्यानंतर पक्ष कार्यालयात काही उमेदवारांनी कार्यकर्त्यांसोबत बैठकीवर भर देतांना दिसून आले. बैठकीनंतर बाहेर येणारे कार्यकर्ते फोनवरुनच प्रत्येक परिसरातील कार्यकर्त्यांशी विचारपूस करतांना दिसून आले. यावेळी एक कार्यकर्ता मोबाईलवरुन, घरपोच मदत करा, काम व्यवस्थित झाले पाहिजे. अशा सूचना देताना दिसून आले. यावेळी काही उमेदवारांचे नातलगदेखील कार्यकर्त्यांसोबत दिसून आले.
जळगाव मनपा निवडणूक : कार्यालयात बसूनच कार्यकर्त्यांमार्फत मतदानाबाबत रात्रभर ‘फिल्डींग’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 1:11 PM
गुप्त गाठीभेटींवर भर
ठळक मुद्देउमेदवारांची वाहने कार्यकर्त्यांच्या ताब्यातकार्यकर्त्यांकडून मतदारांशी संपर्क