शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत वादाची ठिणगी; एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेणार? तर, अजितदादा भाजपच्या बाजूने...
2
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
3
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
4
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
5
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
6
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
7
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
8
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
9
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
10
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
11
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
12
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
13
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
14
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
15
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
16
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
17
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
18
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
19
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
20
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या

जळगाव मनपा निवडणूक : प्रभाग ४ ब मध्ये माजी महापौर विरुद्ध माजी उपमहापौर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 12:33 PM

कोण बाजी मारणार? : शहरवासीयांचे लक्ष

ठळक मुद्देदोन्ही उमेदवारांचा लागणार कसप्रभाग रचनेतील बदल कोणाच्या पथ्यावर पडणार?

जळगाव : मनपा निवडणुकीच्या राजकीय आखाड्यात प्रभाग ४ मधील चारही लढती रंगतदार ठरणार आहेत. मात्र, प्रभाग ४ ब मध्ये माजी महापौर जयश्री धांडे व माजी उपमहापौर भारती सोनवणे यांच्यातील लढतीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. जयश्री धांडे यांच्यासह माजी नगरसेवक कैलास सोनवणे यांच्यासाठी ही लढत अत्यंत प्रतिष्ठेची आहे.या प्रभागात अन्य तीन लढती या तिरंगी व चौरंगी रंगणार असल्या तरी भारती सोनवणे व जयश्री धांडे यांच्यातील लढत ही सरळ होणार आहे. राष्टÑवादी काँग्रेसच्या उमेदवार अपर्णा भालोदकर यांनी माघार घेतल्याने आता केवळ या दोनच उमेदवारांमध्ये लढत रंगणार आहे. कैलास सोनवणे यांनी निवडणुकीच्या तोंडावर भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे शिवसेनेनेदेखील त्यांच्यासमोर तोडीसतोड उमेदवार देऊन कडवे आव्हान उभे केले आहे.दोन्ही उमेदवारांचा लागणार कसभारती सोनवणे या सहाव्यांदा निवडणूक रिंगणात आहेत. तर जयश्री धांडे यादेखील पाचव्यांदा निवडणूक लढवत असल्याने दोन्हीही उमेदवारांकडे निवडणूक लढण्याचा मोठा अनुभव आहे.दोन्हीही उमेदवार अनेक वर्षे सोबत राहिल्याने दोघांनाही एकमेकांची ताकद व कच्चे दुवेदेखील माहिती आहे. या दोन्हीही उमेदवारांसोबत इतर गटातदेखील शिवसेना व भाजपाने दिलेले उमेदवार तगडे असल्याने या दोन्हीही उमेदवारांना विजय तसा सोपा म्हणता येणार नाही. दोन्हीही उमेदवारांचा कस लागणार हे निश्चित आहे.महापौरपदासाठी राखीव जागा असल्याने महत्त्वप्रभाग ४ ब हा प्रभाग ओबीसी महिलांसाठी राखीव असून, महापौरपददेखील ओबीसी महिला राखीव असल्याने या लढतीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे या लढतीकडे जळगावकरांचे लक्ष लागले आहे.प्रभाग रचनेतील बदल कोणाच्या पथ्यावर पडणार?माजी महापौर रमेशदादा जैन व भारती सोनवणे यांचा जुना प्रभाग २१, विजय कोल्हे व खुशबू बनसोडे यांचा जुना प्रभाग क्रमांक २२, तर भाजपाचे मनपातील विरोधी पक्षनेते वामनराव खडके व ममता कोल्हे यांच्या प्रभाग २३ चा काही भाग व भाजपाचे गटनेते सुनील माळी व राष्टÑवादीच्या कंचन सनकत यांच्या प्रभाग ७ चा काही भाग मिळून नव्याने प्रभाग क्रमांक ४ तयार झाला आहे. माजी नगरसेवक कैलास सोनवणे यांचा जुना २१ क्रमांकाचा प्रभाग हा त्यांचा बालेकिल्ला होता. मात्र आता जुने गाव या प्रभागाला जोडले गेले आहे.या प्रभागात येणारा भागया प्रभागात शनिपेठ, दालफड, चौघुले मळा, ओक प्लॉट, बळीरामपेठ, शनिपेठ, नानकनगर, जोशीपेठ, मारोतीपेठ, बालाजीपेठ, रामपेठ, विठ्ठलपेठेचा भागाचा समावेश आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकJalgaonजळगाव