जळगाव : मनपा निवडणुकीसाठी एका उमेदवाराला अर्ज भरताना सरासरी दहा हजार रुपयांचा खर्च ंंंंंंआला आहे. अपक्ष उमेदवाराला हा खर्च तुलनेत कमी आहे.उमेदवारी अर्ज दाखल करताना खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी ५ हजार तर राखीव प्रवर्गातील उमेदवाराला अडीच हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागली. उमेदवारी अर्ज आॅनलाईन भरताना चुक होवू नये म्हणून तज्ज्ञांकडूनच हा अर्ज भरण्यावर उमेदवारांचा भर आहे. आॅनलाईन अर्ज भरण्यासाठीही सायबर कॅफे चालकांनी २०० ते ५०० रुपये घेतले.शिवसेनेकडून ५ हजार रुपयांची अनामत रक्कमशिवसेनेकडून तिकीट मिळविण्याचा इच्छुकांचा ओघ सर्वाधिक होता. त्यामुळे अनामत रक्कमेच ५ हजार रुपये दर निश्चित केले होते. यासह भाजपाचे अनामत रक्कमेच अडीच हजार तर राष्टÑवादी काँग्रेसने एक हजार ५०० रुपये इतकी अनामत रक्कम उमेदवारांकडून घेतली. काँग्रेसने ५०० रुपये अनामत रक्कम घेतली.दरम्यान आता प्रचार खर्च हा जो तो आपापल्या परिने करणारच आहे.राजकीय पक्षांच्या उमेदवारांचा अधिक खर्चअनेक हवशे-नवशेदेखील पक्षाचे तिकीट मिळविण्यासाठी गर्दी करतात. यामुळे प्रत्येक पक्षाने आपल्याकडील अनामत रक्कम देखील निश्चित केली आहे. या अनामत रक्कमेमुळे उमेदवाराचा खर्च वाढला.यंदा एका प्रभागात चार सदस्यीय निवडणूक पध्दत असल्याने एका प्रभागात १६ ते २५ हजारापर्यंत मतदारांची संख्या आहे. त्यातच मतदार याद्यांचे दर देखील ५ हजार रुपयांच्या पुढेच आहे. यामुळे देखील उमेदवारांना अर्ज भरण्याआधी सरासरी १० हजार रुपयांचा खर्च करावा लागला.
जळगाव मनपा निवडणूक : उमेदवारांचा वाढला खर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 12:51 PM
राजकीय पक्षांच्या उमेदवारांचा अधिक खर्च
ठळक मुद्देअनामत रक्कमेमुळे उमेदवाराचा खर्च वाढलाअर्ज भरण्याआधी सरासरी १० हजार रुपयांचा खर्च