जळगाव : मनपा निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे २९ रोजी जळगाव दौºयावर येत आहेत. सायंकाळी ५ वाजता सागर पार्कवर सभा होणार आहे. त्याची तयारी सुरु आहे. मात्र अद्याप दौरा प्राप्त झालेला नाही.दरम्यान, माजी मंत्री एकनाथराव खडसे हे बुधवार २५ पासून प्रचारात सक्रिय होणार आहेत. तर भाजपा आमदार रामदास आंबटकर हे जळगावात प्रचारास येणार आहेत. २६ रोजी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे जळगावात येत असून त्यांच्या उपस्थितीत गणेश कॉलनी, महाबळ व पिंप्राळ्यात सभा होणार असल्याची माहिती आमदार सुरेश भोळे यांनी दिली.भाजपाकडून दुसºया टप्प्याचा प्रचार सुरुमहानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचा प्रचार दुसºया टप्प्यात सुरु आहे. प्रचारात २५ रोजी भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती व जमाती प्रदेशाध्यक्ष सुभाष पारधी हे प्रभाग क्र ४ उमेदवार चेतन गणेश संकत, कांचन नगर, प्रभाग क्र ३ सपकाळे मीना धुडकू, आंबेडकर नगर, प्रभाग क्र १०. सुरेश माणिक सोनवणे, पिंप्राळा, प्रभाग क्र.१३ सुरेखा नितीन तायडे महाबळ व प्रभाग क्र १ प्रिया मधुकर जोहरे शिवाजी नगर या उमेदवारांसाठी सुभाष पारधी हे प्रचार रॅली व कॉर्नर सभेत सहभागी होणार आहेत. अनुसूचित जाती जमाती जिल्हामहानगर अध्यक्ष ज्योती निंभोरे यांनी कळविले आहे. २६ रोजी पुण्याचे खासदार अमर साबळे हे उमेदवारांसाठी रॅली व कॉर्नर सभेत सहभागी होणार आहेत.काँग्रेसतर्फे प्रचार रॅलीकाँग्रेसतर्फेही उमेदवारांचा प्रचार सुरु आहे. काँग्रेसचे शहराध्यक्ष डॉ.अर्जन भंगाळे, कार्याध्यक्ष डॉ.राधेश्याम चौधरी हे प्रचार रॅलीत सहभागी होत आहेत.बहुजन समाज पार्टीची आज जाहीर सभामनपा निवडणुकीच्या प्रचारासाठी बहुजन समाज पार्टीची जाहीर सभा बुधवार, २५ रोजी सायंकाळी ६ वाजता पिंप्राळा घरकूल परिसरात मनपा दवाखान्यासमोर होणार आहे. महाराष्टÑ प्रदेशचे प्रभारी व खासदार डॉ.अशोक सिद्धार्थ (उत्तर प्रदेश) हे मार्गदर्शन करणार आहेत. तसेच मोटरसायकल रॅलीही काढण्यात येणार आहे. पिंप्राळा बौद्धवाड्यापासून ही रॅली काढण्यात येणार असल्याचे पक्षाचे जिल्हा प्रभारी गौरव सुरवाडे कळवितात.दिलीप वळसे पाटील व चित्रा वाघ आज शहरातमहापालिकेच्या राष्ट्रवादी काँग्रेस व पुरस्कृत उमेदवारांच्या प्रचारासाठी विधानसभेचे माजी अध्यक्ष व जिल्ह्याचे निरीक्षक दिलीप वळसे पाटील हे बुधवार २५ रोजी जळगावात येत आहेत. तसेच महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ या २५ व २६ जुलै रोजी दोन दिवस जळगाव दौºयावर येत आहेत. या दोन दिवसीय दौºयात त्या विविध प्रभागातील उमेदवारांचा प्रचार करणार आहेत, असे महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा विजया पाटील कळवितात.सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे उद्या शहरातसामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे हे २६ व २७ रोजी जळगाव दौºयावर येत आहेत. २६ रोजी सकाळी त्यांचे आगमन होईल. एका खाजगी हॉटेलवर ते मुक्कामी थांबणार असून २७ रोजी रात्री पुण्याला रवाना होणार आहेत.
जळगाव मनपा निवडणूक : मुख्यमंत्र्यांसह राज्यस्तरीय नेते प्रचार दौऱ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 1:20 PM