जळगाव : शहरातील प्रभाग ८ ड मध्ये मतदारांना पैसे वाटप करताना एका शिक्षकाला शिवसेनेच्या उमेदवारांनी सोमवारी दुपारी दोन वाजता प्रेमनगरात रंगेहाथ पकडले. त्या शिक्षकाजवळ २५० मतदारांची यादी होती. या यादीसह त्याला शिवसेनेच्या उमेदवारांनी पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल केला नव्हता.पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलेशिवसेनेचे उमेदवार निलेश सुधाकर पाटील, मनोज चौधरी, स्नेहा भोईटे व कल्पना पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी एका शिक्षकाला पैसे वितरीत करताना पकडले. त्याच्याजवळ २५० जणांची मतदार यादी व काही रोख रक्कम होती. शिवसेनेच्या उमेदवारांनी घटनास्थळावरुनच जिल्हा पेठ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी त्याला पोलीस स्टेशनला आणले. त्याच्यापाठोपाठ निलेश पाटील व त्यांचे सहकारीही दाखल झाले.पैसे वाटपाची दिली कबुलीत्या शिक्षकाने अमूक या उमेदवारासाठी आपण पैसे वाटप करीत होता, अशी कबुली दिल्याची माहिती शिवसेनेच्या उमेदवारांनी दिली. पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करु नये यासाठी विनवण्या सुरु होत्या. त्यामुळे उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल झाला नाही. नामदेव दौलत पाटील यांनी तक्रार अर्ज दिला आहे. त्यावरुन चौकशी सुरु असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी ‘लोकमत’ला दिली.दरम्यान, सोमवारी रात्री उशिरापर्यंत शहरात अनेक ठिकाणी पैसे वाटपाच्या तक्रारी येत होत्या.मतदाराला चार हजार रुपये देताना पकडलेयाबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, सोमवारी प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने दिवसभर प्रभागांमध्ये जोरदार प्रचार सुरु असतानाच प्रभाग ८ मध्ये प्रेमनगरातील महाराणा प्रताप शाळेच्या मागील बाजूस असलेल्या परिसरात एक जण मतदारांना पैसे वाटप करीत असल्याची माहिती शिवसेनेच्या उमेदवारांना मिळाली. त्यांनी लक्ष ठेवले. एका घरात गेल्यानंतर मतदाराला चार हजार रुपये देताना शिवसेनेच्या उमेदवारांनी त्याला रंगेहाथ पकडले.पैसे वाटपाच्या रात्री तक्रारी अन् पथकाकडून चौकशीप्रचार तोफा थंडावल्यानंतर शहरात पैसे वाटपास सुरुवात झाली. याबाबत अनेकांनी प्रशासनाकडे तक्रारी केल्या. पथकाने ज्या ठिकाणी पैसे वाटप होत आहे, अशा ठिकाणी भेटी देवून पाहणी केली. सोमवारी रात्री भरारी पथकाने रेल्वे स्टेशन परिसरातील एका हॉटेलमध्ये भेट देवून चौकशी केली. मात्र तक्रारीत तथ्य आढळून आले नाही. एकूण १९ पथकांकडून शहरात गस्त घालण्यात येत होती.पैसे वाटपाच्या घटनेबाबत आमच्याकडे तक्रार नाही. पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यांनी कोणत्या कलमानुसार गुन्हा दाखल करता येईल? याबाबत आचारसंहिता कक्षाकडे मार्गदर्शनही मागितले. कलम १७१(ई) म्हणजेच मतदारांना लाच देणे या कलमान्वये गुन्हा दाखल करता येऊ शकतो.-राहुल मुंडके, निवासी उपजिल्हाधिकारी तथा आचारसंहिता कक्ष प्रमुख.
जळगाव मनपा निवडणूक : मतदारांना पैसे वाटप करताना प्रेमनगरात शिक्षकाला पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 12:43 PM
गुन्हा दाखल करणे टाळले
ठळक मुद्देमतदार यादीसह दिले पोलिसांच्या ताब्यातपकडून पोलिसांच्या ताब्यात दिले