शहरं
Join us  
Trending Stories
1
हरयाणात BJP, जम्मू-काश्मिरात इंडिया; महाराष्ट्रात काय होणार? महायुती-मविआत कोणाचा दबाव वाढेल?
2
हरयाणात घडले तेच महाराष्ट्रातही घडणार; भाजपच्या जल्लोष सभेत देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
3
अखेर ठरले... अजित पवार बारामतीतूनच लढणार; प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केली उमेदवारी
4
जम्मू-काश्मीरमध्ये 'इंडिया', ओमर अब्दुल्ला होणार मुख्यमंत्री; आपनेही खाते उघडले
5
हरयाणात भाजपची हॅट्ट्रिक; काँग्रेसच्या पाच जागा वाढल्या, पण बहुमताची हुलकावणी
6
मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करा; उद्धव ठाकरे यांचे काँग्रेस, शरद पवार गटाला आवाहन
7
ओमर हेच मुख्यमंत्री, वाटेकरी कुणीच नाही; फारूख अब्दुल्लांनी केले जाहीर, काँग्रेसचे ६ विजयी
8
०.८५ टक्के कमी मते अन् गमावल्या ११ जागा; भाजप-काँग्रेसच्या मतांची टक्केवारी जवळपास सारखीच
9
जम्मू-काश्मीर विधानसभा निकालात ‘इंडिया’ने मारली बाजी, तरी भाजप ठरला बाजीगर
10
हरयाणामध्ये भाजप जिंकण्यामागचे गणित काय? काँग्रेसच्या हातात असलेला विजय हिसकावला
11
मागासवर्गीय मतदारांनी काँग्रेसकडे फिरविली पाठ; हरयाणात जाट-बिगर जाट मतांचे ध्रुवीकरण
12
काँग्रेसच्या मनोबलावर परिणाम होणार नाही; हरयाणा निकालावर रमेश चेन्नीथलांचे मत
13
बहिणीच्या दसरा मेळाव्याला भाऊ उपस्थित राहणार का? पंकजा, धनंजय मुंडे महायुतीत असल्याने चर्चा
14
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
15
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
16
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
17
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
18
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
19
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
20
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी

जळगाव मनपा निवडणूक : मतदान यंत्र बिघाडाने मनस्ताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2018 1:33 PM

कोठे मतदार ताटकळले तर कोठे मतदान थांबले

ठळक मुद्देअर्धातास थांबवले मतदानपिंप्राळ्यात अर्धातास मतदान यंत्र बंद

जळगाव : मनपा निवडणुकीसाठी बुधवारी सकाळी मतदानाला सुरुवात झाल्यानंतर अनेक मतदान केंद्रांवर मतदान यंत्रातील बिघाडाने मतदान थांबले तर कोठे मतदारांना ताटकळत थांबावे लागले. यामुळे मतदारांना मनस्ताप होण्यासह गोंधळही उडाला.अर्धातास थांबवले मतदानप्रभाग ११ मधील बहिणाबाई ज्ञान विकास माध्यमिक विद्यालयातील बुथ क्रमांक १ मध्ये मतदान यंत्रात बिघाड झाल्यामुळे अर्धातास मतदान थांबविण्यात आले होते. यामुळे या ठिकाणी मतदारांच्या रांगा लागल्या. तत्काळ मतदान यंत्राची दुरुस्ती केल्यानंतर १०.३० वाजेपासून मतदानाला पुन्हा सुरुवात झाली.प्रभाग १२ व प्रभाग ११ मधील काही मतदार केंद्रावर मतदारांना मतदार याद्यांमध्ये नावे सापडले नाही. त्यामुळे बहिणाबाई माध्यमिक विद्यालय, भोईटे शाळा, भगीरथ शाळेमधील मतदान कें द्रावर अनेक मतदार नाव न सापडल्याने मतदान न करताच परत गेले. विधानसभेच्या मतदार यादीवरुन मतदार यादी तयार करण्यात आल्यामुळे ज्या मतदारांचे नाव विधानभसभेच्या यादीत नाही अशा मतदारांचे नावे या यादीत देखील असणार नसल्याची माहिती मनपा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.मतदारांचा गोंधळप्रभाग क्रमांक १९मध्ये एकाच वेळी चार उमेदवारांना मतदान करायचे असल्याने अनेक मतदारांचा गोंधळ उडाला. काही मतदारांचा समज असा झाला की, एकदा एक चिन्ह दाबले की चार वेळेस तेच चिन्ह दाबावे लागते. यामुळे ज्यांना क्रॉस वोटींग करायचे आहे, अशांनी काहींनी सरसकट एकाच पक्षाला मतदान केल्याची माहिती मिळाली.असा उडाला गोंधळप्रभाग क्रमांक १९मध्ये एका मतदारास पक्ष पाहून नव्हे तर उमेदवार पाहून मतदान करायचे होते. दोन या पक्षाला तर दोन त्या पक्षाला. मात्र मतदान यंत्र पाहून या मतदाराचा गोंधळ उडाला. समज असा झाला की, सुरुवातीला ज्या चिन्हाचे बटन दाबले. त्याच चिन्हावर चारही वेळेस बटन दाबायचे आहे. यामुळे त्याने चारही एकाच चिन्हाचे बटन दाबले. बाहेर आल्यावर जेव्हा समजले की, वेगवेगळया चिन्हाचे बटन दाबून वेगवेगळ्या चारही जणांना मतदान करता येणार आहे, त्यावर मतदार हताश झाला.माझे दोन मत नाईलाजाने दुसरीकडे गेले, अशी प्रतिक्रिया या मतदाराने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.पिंप्राळ्यात अर्धातास मतदान यंत्र बंदपिंप्राळा परिसरातील सेमी इंग्रजी मनपा शाळा क्रमांक ३५ मध्ये सकाळी ९ वाजता तांत्रिक अडचणीमुळे ईव्हीएम मशिन अचानक बंद पडल्याचा प्रकार घडला़ यामुळे तब्बल अर्धातास मतदारांना रांगेत ताटकळत उभे रहावे लागले़ सकाळी मतदानाच्या दोन तासात पिंप्राळा, गणेश कॉलनी, निमखेडी रस्ता, खोटेनगरमधील मतदान केंद्रांवर धीम्यागतीने मतदान सुरू होते़ मात्र, साडे दहा वाजेनंतर या परिसरातील मतदान केंद्रांवर मतदारांची चांगलीच गर्दी वाढलेली होती़ गणेश कॉलनीतील प.न. लुंकड कन्या शाळेतील केंद्रावर सकाळपासून तर सायंकाळपर्यंत गर्दी होती.बोगस मतदानाची अफवादरम्यान, इंग्रजी मनपा शाळा क्रमांक ३५ या केंद्रात दुपारी बोगस मतदान झाल्याची अफवा पसरली़ मात्र, याबाबत लोकमतने शहानिशा केली असता कुठलाही प्रकार केंद्रात घडला नसल्याचे केंद्रातील कर्मचाºयांनी सांगितले़मतदाराकडे दोन चिठ्ठया असल्यामुळे हा गैरसमाजातून अफवा पसरविण्यात आली असल्याची त्यांनी सांगितले़

टॅग्स :Jalgaon Electionजळगाव महानगरपालिका निवडणूकJalgaonजळगाव