जळगाव : आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यांपासून वेतन रखडल्याचा मुद्दा जिल्हा परिषद सदस्य गोपाळ चौधरी यांना शुक्रवारी जिल्हा नियोजन समितीच्या सभेत उपस्थित केला़ यावर लिपीक सचिन पाटील यांचे निलंबन करा, असे आदेश पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सभेत दिले आहेत.दरम्यान, सुरूवातीला कर्मचाºयाचे नाव निलेश पाटील उच्चारले गेल्याने काही काळ गोंधळ झाला होता़ मात्र, आरोग्य विभागाने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे़ निलेश पाटील यांच्याबाबत गेल्या दोन महिन्यापूर्वी आलेल्या तक्रारीवरून मोठे वादळ आरोग्य विभागात उठले होते़ त्यांची बदलीही करण्यात आली होती़ मात्र वेतन विलंबनाचा प्रकारातील ते निलेश पाटील नसून सचिन पाटील असल्याचा खुलासा आरोग्य विभागाने केला आहे़ दरम्यान, रक्कम असताना केवळ लिपीकामुळे हे वेतन लांबल्याचे सांगण्यात आले़आज करतो उद्या करतो असे सांगत त्याने हे वेतन लांबले, आता आदेशानुसार निलंबनासंदर्भात प्रस्ताव तयार करून तो वरिष्ठांकडे सादर करू, अशी माहिती प्रभारी आरोग्य अधिकारी समाधान वाघ यांनी दिली़ दरम्यान, आरोग्य विभागाच्या वेतन विलंबासंदर्भात ‘लोकमत’नेही आवाज उठविला होता़दरम्यान, पगार नसल्याने कर्मचारी हवालदिल झाले आहेत.
जळगाव जि.प.आरोग्य विभागातील लिपिकाचे होणार निलंबन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 12:24 PM