ऑनलाईन लोकमत
जामनेर,दि.13 - न्यू.इंग्लिश स्कूल मध्ये अकरावी विज्ञानची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. गुरुवारी सकाळी विद्यार्थी व पालक शाळेत प्रवेशासाठी आले असता मुख्याध्यापक नसल्याने व लिपीकांचे कार्यालय बंद असल्याने गोंधळ वाढला.
अकरावी प्रवेशाची तिसरी यादी जाहीर झाल्यानंतर प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी शाळेत गर्दी करीत आहेत. या शाळेत दोन मुख्याध्यापक नियुक्तीचा वाद कायम आहे. संस्था पदाधिकारी यांचेतील वादामुळे गटबाजी वाढली आहे. अकरावीत प्रवेश मिळत नसल्याने विद्यार्थी व पालक संतप्त झाले. गुरुवारी साडेबारा वाजेपयर्ंत हा गोंधळ सुरूच होता. अखेर पर्यवेक्षकांनी मुख्याध्यापक रजेवर असल्याचे जाहीर करीत प्रवेशासाठी दुस:या दिवशी येण्याचे सांगितल्याने विद्यार्थी व पालक माघारी परतले.