सय्यद लियाकतजामनेर, जि.जळगाव : तालुक्यात गेल्या दोन वर्षापासून मुक्ताईनगर-जामनेर-पहूर-जळगाव ते औरंगाबादकडे जाणारा राष्ट्रीय महामार्ग, जामनेर-फत्तेपूर-देऊळगाव या रस्त्यांचे काम अतिशय संथ गतीने सुरू असल्यामुळे गेल्या दीड वर्षात तालुक्यात ८० अपघातात ५० जणांचा बळी गेला असून शंभरावर व्यक्ती जखमी झाल्या आहेत. याला फक्त खोदलेले रस्ते वो रस्त्यावर पडलेले खड्डे, ठेकेदार, प्रशासन हे जबाबदार आहे.सध्या जामनेरहून बोदवडला जाणारा रस्ता खोदून ठेवल्याने दुचाकी व प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षांना, एसटी बसला त्रासदायक ठरत आहे. अशीच स्थिती जामनेर पहूर रस्त्याची आहे. जामनेर येथून पहूर मार्ग औरंगाबाद, पुणे, शेंदुर्णी, पाचोरा जाणाºया एसटी व खाजगी बसेसची संख्या जास्त आहे. अत्यंत खराब रस्त्यामुळे काही एसटी बस खासगी ट्रॅव्हल्स यामार्गएवजी दुसºया मार्गाने वळविण्यात आल्या आहेत. जळगाव येथून जामनेर येताना नेरी व पहूरपर्यंतचा रस्ता वाहतुकीसाठी अयोग्य ठरत असल्याने जळगाव-जामनेर-पहूर-जळगाव-शेंदुर्णी-जळगाव हा प्रवास मोठा त्रासदायक ठरत आहे. एक ते दीड तासाच्या प्रवासाला यामुळे दोन तास वेळ लागत आहे. परिणामी जामनेर येथून जळगाव जाण्यासाठी वाहनधारक कुºहा, नशिराबाद या मार्गाचा वापर करीत आहेत. गेल्या दोन ते अडीच वर्षापूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या महामार्गाच्या कामांची घोषणा केली होती. काम सुरू होण्यास विलंब लागला सुरू झालेले काम मुदतीत पूर्ण होऊ शकले नाही.फत्तेपूर देवळगाव रस्त्याचेही तेच हाल?जामनेर-फत्तेपूर-देऊळगाव-धामणगाव या रस्त्याच्या रुंदीकरणाचे व दुरुस्तीचे काम गेल्या वषार्पासून सुरू आहे. दुरुस्तीच्या नावाखाली ठेकेदाराने जागोजागी रस्ता खोदून ठेवला आहे. तालुक्यातील हा महत्त्वाचा रस्ता असून बुलढाणा जिल्ह्याला जोडणारा असल्याने २४ तास वाहतूक सुरू असते. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदार यांचे दुर्लक्षामुळे तेही काम संथ गतीने सुरू आहे.दीड वर्षात ८० अपघात ५० जणांचा बळीतालुक्यात गेल्या दीड वर्षापासून रस्त्यांचे काम संथ गतीने सुरू आहे. यामुळे आतापर्यंत ८० अपघातात ५० जणांचा बळी व १०० च्या अधिक वर जण जखमी झाले असल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून मिळाली आहे. यात सर्वात जास्त अपघात हे जामनेर ते पहूर रस्त्यावर झाले आहेत.
जामनेर तालुक्यात दीड वर्षात ८० अपघातात ५० जणांचे बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2019 7:22 PM
गेल्या दोन वर्षापासून मुक्ताईनगर-जामनेर-पहूर-जळगाव ते औरंगाबादकडे जाणारा राष्ट्रीय महामार्ग, जामनेर-फत्तेपूर-देऊळगाव या रस्त्यांचे काम अतिशय संथ गतीने सुरू असल्यामुळे गेल्या दीड वर्षात तालुक्यात ८० अपघातात ५० जणांचा बळी गेला असून शंभरावर व्यक्ती जखमी झाल्या आहेत.
ठळक मुद्दे खराब रस्त्यांनी केले हैराणखड्ड्यांमुळे अपघातात वाढ