जामनेर, जि.जळगाव : तालुक्यातील नेरी व देवपिंप्री येथील जुन्या गुन्ह्यातील आरोपी व साक्षीदारांमध्ये बुधवारी दुपारी न्यायालयाच्या आवारात हाणामारीची घटना घडल्याने खळबळ उडाली. यात एक जण जखमी झाले असून पोलिसात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.मनोज प्रताप तागवाले (राहणार नेरी, ता.जामनेर) यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शांताराम दगडू तागवाले यांनी न्यायालयाच्या आवारात दगडाने कपाळावर मारहाण करुन जखमी केले तर रत्नाबाई शांताराम तागवाले यांनी जीवे ठार मारण्याची धमकी दिली. शांताराम व रत्नाबाई यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तपास हवालदार किशोर पाटील तपास करीत आहे. जखमी मनोज तागवाले यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले.न्यायालयात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी गुणवंत श्रीधर सोनावणे यांनी दिलेल्या फियार्दीत म्हटले आहे की, दुपारी साडेचारच्या सुमारास न्यायालयीन कामकाज करीत असताना न्यायालयातील कोर्टाच्या बाजूला गर्दी जमा झाली होती व ते हाणामारी व आरडाओरड करीत होते. पोलीस नीलेश सोनार, लिपिक रघुनाथ पवार, लोखंडे यांच्यासह त्यांना समजविण्याचा प्रयत्न केला.मनोज प्रताप तागवाले, प्रताप नारायण तागवाले, ज्वालासिंग प्रताप तागवाले, शांताराम नारायण तागवाले (सर्व राहणार नेरी, ता. जामनेर) व शांताराम दगडू तागवाले, रत्नाबाई शांताराम तागवाले (दोन्ही राहणार देवपिंप्री, ता जामनेर) यांच्याविरुद्ध भादंवि १६०, ३७ (१) (३) चे उल्लंघन ३५ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. तपास हवालदार योगेश महाजन करीत आहे.दरम्यान, न्यायालयात गेल्या १५ दिवसांपासून पहूर व जामनेर पोलीस ठाण्यातील सहाय्यक फौजदार गैरहजर असल्याची माहिती मिळाली.
जामनेरला न्यायालयाच्या आवारात हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 10:09 PM
जामनेर तालुक्यातील नेरी व देवपिंप्री येथील जुन्या गुन्ह्यातील आरोपी व साक्षीदारांमध्ये बुधवारी दुपारी जामनेर न्यायालयाच्या आवारात हाणामारीची घटना घडल्याने खळबळ उडाली.
ठळक मुद्देजुन्या गुन्ह्यातील वाद आला उफाळूनएक जण जखमी