जामनेर, जि.जळगाव : पावसाळ्याचे अडीच महिने संपत असूनदेखील शहरातून वाहणाऱ्या कांग नदिचे पात्र मात्र कोरडेच आहे. गोद्री जवळील कांग प्रकल्पातील जल साठ्यात गुरुवारी झालेल्या दमदार पावसामुळे समाधानकारक वाढ झाली.तालुक्यात आजअखेरपर्यंत ३१८.८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, सरासरीच्या ४४.२ टक्के पाऊस झाला आहे. तालुक्यात मंडळनिहाय मिलीमीटरमध्ये झालेला पाऊस असा- जामनेर ४१०, नेरी ३१७ , पहूर ३२६, शेंदुर्णी ३७६ , वाकडी २२३, तोंडापूर ३०७, फत्तेपूर २५९ व मालदाभाडी ३२५ मिलीमीटर.तोंडापूरसह इतर प्रकल्पातील पाणी साठ्या वाढ होण्यासाठी अजून मुसळधार पावसाची गरज आहे.
जामनेरला कांग नदी पात्र कोरडेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 6:35 PM