जामनेर/ पिंपळगाव हरे, ता. पाचोरा : जामनेर तसेच पिंपळगाव हरे. येथे गुरुवारी १८ रोजी श्रीराम रथोत्सव साजरा झाला. गावातून सवाद्या मिरवणूक काढण्यात आली. भाविकांनी दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली होती.जामनेरपांडुरंग गोविंद महाराज संस्थांनतर्फे गुरुवारी श्रीराम रथाची जामनेर येथे मिरवणूक काढण्यात आली. नगारखान्यात रथाची विधिवत पूजा करून मिरवणुकीस सुरुवात झाली. येथील रथोत्सवाला सुमारे १७० वर्षांची परंपरा आहे. श्रीराम जन्मोत्सवाची सांगता रथ मिरवणुकीने होते. मिरणवुकीची सांगता नगारखान्यातच झाली. रथ मिरवणुकीत नगरसेवक जितू पाटील, आतिश झाल्टे, बाबुराव हिवराळे, दीपक तायडे, चंद्रकांत बाविस्कर, दीपक पाटील, दत्तात्रय सोनवणे, नितीन झाल्टे, संस्थानंचे प्रताप पाटील, नरेंद्र पाटील, सुधाकर पाटील, संभाजी सोनार, मुकुंदा माळी, अभिमान मिस्त्री, गोविंदा पांढरे, सुभाष शिंदे, अरविंद पाटील, विठ्ठल येणे, गोटू देशपांडे, दीपक जोशी, दिलीप जोशी, प्रभाकर गायकवाड, प्रदीप महाजन, अशोक टाहकळे, गोलू टाहकळे, राजू शर्मा, कडूबा माळी, विठ्ठल माळी आदींसह भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.पिंपळगाव हरे, ता. पाचोरायेथे २०० वर्षांपेक्षा आधिक वर्षांची परंपरा असलेला श्रीराम रथोत्सव १८ रोजी उत्साहात साजरा झाल. सायंकाळी संत गोविंद महाराजांचा जयजयकार करीत विठ्ठल मंदिरा जवळून रथाची मिरवणूक निघाली. देवदेतांची पूजा नरहर रामदास पाटील व रविद्र नारायण पाटील यांनी सपत्नीक केली. संस्थान अध्यक्ष शामराव महाजन, एपीआय गजेंद्र पाटील यांनीही आरती केली. अर्चक म्हणून मनोज साखरे तर उपाध्याय म्हणून अजय पाठक यांनी काम पाहिले. रथाला ऊटी लावायचे काम प्रकाश गित,े सुनील गिते, नितीन गिते यांनी केले. प्रसाद साखरे, लक्ष्मण धोबी, शैलेंद्र देशमुख आदी भक्त गण काम करीत होते. दरम्यान डीवायएसपी कातकडे व ८ पोलीस हे सायंकाळी साडेसहाच्या सुमारास आले. रथाचा समारोप विठ्ठल मंदिराजवळ रात्री झाला.
जामनेर आणि पिंपळगाव हरे. येथे रथोत्सव उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 9:03 PM