जामनेर, जि.जळगाव : नवीन बस पोर्टमध्ये गुरुवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास एसटीत चढणाऱ्या तीन महिलांच्या गळ्यातील सोन्याची पोत चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडली. गेल्या दोन महिन्यातील वाढत्या चोरीच्या घटनामुळे येथील बसस्थानक महिलांसाठी असुरक्षित ठरत असल्याचे बोलले जात आहे.गुरुवार आठवडे बाजाराचा दिवस असल्याने व सध्या लग्नसराई असल्याने स्टँडवर प्रवाशांची मोठी गर्दी होती. जळगाव जाणाºया गाडीत चढत असलेल्या महिलांच्या गळ्यातील प्रत्येकी एक ग्रॅम वजनाच्या पोत लांबवल्याने स्थानकावर गोंधळ उडाला व गर्दी जमा झाली.जामनेरला आलेल्या आरसीपीच्या १३ जवानांचा बंदोबस्त तैनात केला गेला. सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश काळे, सुनील माळी, नीलेश घुगे , योगेश महाजन, चंद्रकांत पाटील यांनी चौकशी केली. पोलीस ठाण्यात या प्रकाराची नोंद नसल्याचे सांगण्यात आले. वारंवार घडणाºया चोरीच्या घटनांनी महिला प्रवाशांमध्ये असुरक्षितता निर्माण झाली आहे.
जामनेरचे बसस्थानक महिलांसाठी असुरक्षित?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 10:13 PM
नवीन बस पोर्टमध्ये गुरुवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास एसटीत चढणाऱ्या तीन महिलांच्या गळ्यातील सोन्याची पोत चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडली
ठळक मुद्देतीन महिलांच्या गळ्यातून लांबविल्या पोतदोन महिन्यात चोरीच्या घटनांमध्ये झाली वाढ