जामनेर, जि.जळगाव : शहरातील पहूर रोडवरील खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेली ४५ वर्षीय महिला अचानक अत्यवस्थ झाली. नातेवाईकांनी तिला जवळच्या दुसऱ्या रुग्णालयात हलविले असता उपचार घेत असताना बुधवारी रात्री साडेआठला त्या रुग्ण महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. महिलेच्या संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयावर हल्ला चढवत डॉक्टरांच्या कॅबीनसह इतर साहित्याची तोडफोड केली.ही महिला तीन दिवसांपासून या रुग्णालयात उपचार घेत होती. मात्र प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने नातेवाईकांनी डॉक्टरांना रुग्ण महिलेस इतरत्र हलविण्याबाबत विचारले. उपचार करणाºया डॉक्टरांनी हलविण्यास नकार दिल्याचे नातेवाईकांनी सांगितले. आज रात्री साडेसातला महिलेची प्रकृती खालावल्याने त्यांना जवळच्या रुग्णालयातील अति दक्षता विभागात हलविले असता उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला.घटनेची माहिती समजताच नागरिकांनी रुग्णालयाभोवती गर्दी केली. भाजप तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, जितू पाटील, दीपक पाटील, नवल राजपूत, नाजीम शेख, खलील खान, जावेद मुल्लाजी, नुरू शेख यांनी महिलेच्या नातेवाईकांची समजूत घातली.घटनेची माहिती समजताच पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे व सहकाऱ्यांनी रुग्णालयाकडे धाव घेतली व जमावास शांत केले. पोलिसात याबाबत अद्यापपावेतो कोणतीही नोंद झालेली नाही.
जामनेरला खासगी रुग्णालयाची तोडफोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 11:03 PM
जामनेर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेली महिला अचानक अत्यवस्थ झाली. नातेवाईकांनी तिला जवळच्या दुसऱ्या रुग्णालयात हलविले असता उपचार घेत असताना बुधवारी रात्री साडेआठला त्या रुग्ण महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. महिलेच्या संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयावर हल्ला चढवत डॉक्टरांच्या कॅबीनसह इतर साहित्याची तोडफोड केली.
ठळक मुद्देरुग्ण महिलेचा मृत्यूरुग्णालयावर हल्ला चढवत डॉक्टरांच्या कॅबीनसह इतर साहित्याची तोडफोड