आॅनलाईन लोकमतजामनेर, दि.८ : शहरातील एका भागात राहणाºया १३ वर्षीय मुलीवर दोघा अल्पवयीन मुलांनी केलेल्या अत्याचारानंतर पीडित मुलीने बुधवारी सकाळी जामनेर उपजिल्हा रुग्णालयात बाळाला जन्म दिला. पोलीस तपासाचा भाग म्हणून या प्रकरणात बाळाची डीएनए चाचणी होणार आहे.सातव्या इयत्तेत शिक्षण घेत असलेल्या या पीडितेवर गेल्या वर्षभरापासून ती राहत असलेल्या परिसरातील दोघा अल्पवयीन मुलांनी अत्याचार केला होता. याबाबत पीडित मुलीच्या आईने २४ जून २०१७ रोजी जामनेर पोलिसात दोघांविरूद्ध फिर्याद दिली होती. त्यानुसार दोन अल्पवयीन मुलांविरूद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता.दरम्यान, या प्रकरणातील पीडित अल्पवयीन मुलीला प्रसुतीसाठी बुधवारी जामनेर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तिने बाळाला जन्म दिला असून आई व बाळाची प्रकृती चांगली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक माधुरी बोरसे यांनी उपजिल्हा रुग्णालयात येत पीडितेची चौकशी केली.बाळाची होणार डीएनए चाचणीया प्रकरणी गुन्हा दाखल झाला असल्याने तपासाचा भाग म्हणून नवजात अर्भकाची डीएनए चाचणी करण्यात येणार आहे. या घटनेचे आरोपपत्र येत्या सोमवारी न्यायालयात सादर करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.दोन्ही संशयित जामिनावर मुक्तअल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारे दोन्ही संशयित आरोपी यांना पोलिसांनी अटक करीत त्यांची सुधारगृहात रवानगी केली होती. मात्र त्यानंतर दोघांची जामीनावर मुक्तता करण्यात आली आहे.
बुधवारी सकाळी साडेसात वाजता पीडिता प्रसुतीसाठी जामनेर उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाली. सकाळी ८ वाजता बाळाला जन्म दिला. आई व बाळाची प्रकृती उत्तम आहे.-डॉ.विनय सोनवणे, वैद्यकीय अधीक्षक, जामनेर उपजिल्हा रुग्णालय.