जामनेर : उत्तरकार्यावर खर्च न करता विधी घरातच साधेपणाने करुन गावातील स्मशानभूमीत वृक्षलागवड करुन त्यांचे संगोपन करण्याचा संकल्प देवपिंप्री, ता.जामनेर येथील माजी सरपंच व बाजार समितीचे सभापती तुकाराम निकम यांनी केला.निकम यांच्या पत्नी लताबाई यांचे शनिवारी उत्तरकार्य होते. गावातील स्मशानभूमीत निकम यांनी २५ वृक्ष लावले व त्यांच्या संगोपनाची जबाबदारी स्वीकारली.या निर्णयाचे ग्रामस्थांनी स्वागत केले. सुरेश शिंदे, रमेश पाटील, रवींद्र हिंगणे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होत
देवपिंप्री येथे उत्तरकार्याच्या खर्चातून वृक्षारोपण संकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2020 8:37 PM