जळगाव: जामनेर तालुक्यातील काही भागात गुरुवारी रात्री ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने सूर नदीला प्रचंड पूर आला. त्यामुळे सहा गावांना या पुरतामुळे फटका बसला आहे. दरम्यान, पावसाच्या ‘जोर’धारांमुळे पारोळा तालुक्यात ५ जनावरांचा बळी गेला आहे. जामनेर तालुक्यातील सूर नदीला पूर आल्याने रांजणी, बेटावद येथे घरांच्या पडझडीसह पिकांचे प्रचंड नुकसान झाले. तर शेवगे पिंप्री, देवळसगाव, कापूसवाडीतही पिकांची मोठी हानी झाली आहे.
बोदवडमध्येही नुकसान
बोदवड तालुक्यातील कुऱ्हा हरदो व धौन्डखेडा येथील नाल्याला पूर आल्याने काही घरांचे व शेतीचे नुकसान झालेले आहे.
पशुधनाचे बळी
पारोळा तालुक्यात गुरुवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे आलेल्या पुरात शेवगे येथील दोन बैल वाहून गेले. तसेच अन्य तीन गावांमध्येही पशुधनाचे तीन बळी गेले.