जळगाव : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने तीन दिवस महापालिका क्षेत्रात जो ‘जनता कर्फ्यू’ लागू केला होता, त्याला यावेळी खरोखरच जनतेने मोलाची साथ दिल्याची भावना जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केली. या जनता कर्फ्यू चे सकारात्मक परिणाम येत्या काही दिवसातच दिसून येणे अपेक्षित असल्याचेही ते म्हणाले. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी शुक्रवारपासून रविवारपर्यंत तीन दिवस महापालिका क्षेत्रात जनता कर्फ्यू लागू केला होता. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश दिले होते, इतकेच काय भाजीबाजारही यावेळी बंद ठेवण्यात आला होता. या जनता कर्फ्यू ची अमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलीस व महापालिकेवर सोपविण्यात आली होती. यावेळच्या जनता कर्फ्यू त प्रथम असे घडले की पोलीस रस्त्यावर नसतानाही जनतेने स्वयंस्फूर्तीने प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. यावेळी दंडूका उगारण्याची वेळच पोलिसांवर आली नाही. जनतेने गांभीर्य ओळखून पोलीस प्रशासनाला सहकार्य केले. येत्या काही दिवसात याचे सकारात्मक प्रतिसाद दिसून येतील, नाहीच दिसले तर यात वाढ करण्याचे संकेत आधीच मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याची माहिती डॉ.मुंढे यांनी दिली.
‘जनता कर्फ्यू’ ला लाभली जनतेची साथ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 7:16 PM
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने तीन दिवस महापालिका क्षेत्रात जो ‘जनता कर्फ्यू’ लागू केला होता, त्याला यावेळी खरोखरच जनतेने मोलाची साथ दिल्याची भावना जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केली. या जनता कर्फ्यू चे सकारात्मक परिणाम येत्या काही दिवसातच दिसून येणे अपेक्षित असल्याचेही ते म्हणाले.
ठळक मुद्देपोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे...तर लॉकडाऊनची शक्यता